रावेर (प्रतिनिधी) शासकीय कंत्राटदाराकरून दोन्ही कामांची बीले पास करण्यासाठी लाचेची मागणी करणाऱ्या वन परिक्षेत्रीय अधिकारी याला एसीबीने अटक केली आहे.
यासंदर्भात अधिक असे की, तक्रारदार हे औरंगाबाद जिल्ह्यातील रहिवाशी असून ते शासकीय कंत्राटदार आहेत. त्यांनी जळगाव जिल्ह्यातील वनविभागकडून रावेर तालुक्यात ए. एन. आर. रोपवन अंतर्गत त्यांनी चेनसिंग फेनसिंग व गेटचे काम ऑनलाईन ई टेन्डरींगच्या पध्दतीने घेतले होते. यापैकी त्यांनी दोन काम पुर्ण केले होते. कामाचा त्यांना अद्याप धनादेश मिळालेला नव्हता. धनादेशाच्या मोबदल्यान वन परिक्षेत्रीय अधिकारी मुकेश हरी महाजन (वय ४५ रा. रावेर ता.जि.जळगाव) यांनी ५ टक्के कमिशनप्रमाणे १ लाख ३० हजार रूपयांची मागणी केली. तडजोडी अंत १ लाख १५ हजार रूपयांची मागणी केली. तक्रारदार यांनी जळगाव लाचलुचपत विभागाकडे तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून आज सकाळी सापळा रचून तडजोडीची मागणी केली म्हणून अटक केली आहे. संशयित आरोपी लोकसेवक मुकेश हरी महाजन याच्यावर रावेर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
















