धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील साळवा ते धरणगाव, निशाणेमार्गे तात्काळ एसटी बस सुरू करणे बाबत पाणीपुरवठा मंत्री ना.गुलाबराव पाटील यांच्याकडे मागणी करण्यात आली आहे.
निशाणे ग्रामपंचायततर्फे ग्रामसेवकांनी यासंदर्भात ठराव करून दिला. यावेळी बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे पी.एम.पाटील सर,उप तालुका प्रमुख मोती पाटील,हेमंतभाऊ चौधरी,निशाणे येथील ग्रामपंचायत सदस्य शरद पाटील,प्रकाश मालचे,भगवान ठाकरे, दिनेश ठाकरे, उखर्डू पाटील हे उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या हितासाठी विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी तात्काळ बस सुरू करण्याचे आश्वासन मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले.