जळगाव (प्रतिनिधी) भुसावळ तालुक्यात कुन्हे पानाचे येथील तलाठी आणि कोतवाल यांना उताऱ्यावरील बोजाचे नाव कमी करण्यासाठी अवघ्या २४० रूपयांची लाच मागणे महागात पडले आहे. २४० रुपयांची लाच मागीतल्याप्रकरणी दोघांना एसीबी पथकाने आज रंगेहात अटक केली आहे.
याबाबत वृत्त असे की, तालुक्यातील कुहे पानाचे येथील एका शेतकऱ्याला आपल्या उताऱ्यावरील बोजा कमी करायचा होता. यासाठी केवळ २४० रुपयांची लाच मागणे भुसावळ तालुक्यातील कु-हे पानाचे येथील तलाठी व कोतवाल यांना महागात पडले आहे. प्रविण मेश्राम व प्रकाश अहिर अशी तलाठी व कोतवाल यांची अनुक्रमे नावे आहेत. २४० रुपयांची लाच मागीतल्याप्रकरणी दोघे एसीबीच्या पथकाच्या जाळ्यात अडकले. दोघांना ताब्यात घेण्याची कारवाई दुपारी दिड वाजेच्या सुमारास सुरु होती. जळगाव लाचलुचपत विभागाचे पोलिस उप अधिक्षक गोपाळ ठाकुर यांच्या मार्गदर्शनाखाली हा सापळा रचण्यात आला.