जळगाव (प्रतिनिधी) शहरात एक धक्कादायक घटना घडली आहे, ज्यात पत्रकार विक्रम कापडणे यांना महानगर पालिकेत बातमी कव्हर करण्यासाठी गेले असता सहाय्यक आयुक्त गणेश चाटे यांनी त्यांचा कॅमेरा हिसकावून घेतला व त्यातील मेमरी कार्ड काढून टाकले तसेच त्यांच्यावर दमदाटी करण्याचा प्रकारही समोर आला आहे.
या प्रकरणी जळगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये सहाय्यक आयुक्त गणेश चाटे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रमोद रूले यांनी यावर नाराजी व्यक्त करत, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना दिलेल्या निवेदनात लोकशाहीचा आवाज दाबणाऱ्या या मुजोर अधिकाऱ्यावर कठोर कारवाईची मागणी केली आहे.
या घटनेच्या विरोधात संघटनेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांसह जळगाव शहरातील सर्व पत्रकार एकत्र आले होते.