जळगाव (प्रतिनिधी) येथील शिरसोली रस्त्यावरील श्री गुलाबराव देवकर मल्टीस्पेशालिटी वैद्यकीय व आयुष रुग्णालयात दर गुरुवारी अत्यल्प दरात मोतीबिंदू शस्त्रक्रिया केल्या जात असून, आतापर्यंत 375 जणांवर शस्त्रक्रिया करून त्यांना नवी दृष्टी देण्यात आली आहे.
देवकर रुग्णालयाने सुरु केलेल्या मोतीबिंदू शस्त्रक्रिया महाअभियानात केवळ 2500/- रुपयात मोतीबिंदू शस्त्रक्रिया व 6000/- रुपयात फेको म्हणजेच बिनटाक्याची शस्त्रक्रिया केली जात आहे. दर गुरुवारी होणाऱ्या या शस्त्रक्रियांना जिल्हाभरातून मोठा प्रतिसाद मिळत आहे. रुग्णांनी या अत्यल्प दरातील शस्त्रक्रियांचा लाभ घ्यावा, असे आवाहन रुग्णालय प्रशासनाने केले आहे.