जळगाव (प्रतिनिधी) सहाय्यक कामगार आयुक्त, जळगाव यांचेमार्फत महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळाचे नोंदणी व लाभवाटपाचे कामकाज करण्यात येते. कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाने सर्व नोंदीत घरेलू कामगारांना १ हजार ५०० रुपये अर्थसहाय्य देण्याच्या सूचना दिलेल्या आहेत.
सहाय्यक कामगार आयुक्त, जळगाव कार्यालयातंर्गत सन २०११ ते ३१ मार्च, २०२१ या कालावधीत सुमारे १४ हजार घरेलू कामगारांची नोंदणी करण्यात आलेली आहे. मात्र बहूतांश घरेलू कामगारांचा बँक तपशील नसल्यामुळे अर्थसहाय्य वाटप करणे शक्य होत नाही. तरी सहाय्यक कामगार आयुक्त, जळगाव कार्यालयाकडे नोंदीत सर्व घरेलू कामगारांनी त्यांची वैयक्तिक माहिती व बँकेचा तपशिल https://public.mlwb.in/public या लिंकचा वापर करुन अद्यावत करावा. याबाबत काही अडचण असल्यास सहाय्यक कामगार आयुक्त, जळगाव यांचे कार्यालयात संपर्क साधावा. असे आवाहन चद्रकांत बिरार, सहाय्यक कामगार आयुक्त, जळगाव यांनी केले आहे.