धरणगाव प्रतिनिधी – धरणगाव शहरात विजेचा लपंडाव सुरु आहे. गेली आठ-दहा दिवस विज खंडित होण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. याला सर्वस्वी जबाबदार महावितरण कंपनीचे अधिकारी असून येत्या आठ दिवसात वीज पुरवठा पूर्ववत न झाल्यास तिव्र आंदोलन करण्यात येईल. त्याची पूर्ण जबाबदारी वीज वितरण अधिकारी यांची असेल. असा इशारा शिवसेना उपनेते गुलाबराव वाघ यांनी बोलताना केला.
गेली आठ दिवस धरणगाव तालुक्यातील ग्रामीण भागासह धरणगाव शहरातील विजेच्या तारा बदलणे, पोल बदलणे हे काम सुरु आहे. याचा परिणाम म्हणून, लहान-मोठे उद्योगधंदे आणि नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर मोठा परिणाम होत आहे. या बाबत जनमानसात संतापाची लाट पसरली असे मत शिवसेना उपनेते गुलाबराव वाघ यांनी मत व्यक्तकेले
दुरुस्तीच्या नावाखाली खंडित होणारा वीजपुरवठा
गरज नसतानाही दुरुस्तीच्या कामासाठी वीजपुरवठा वारंवार खंडित केला जात आहे, ज्यामुळे नागरिकांना गैरसोय होत आहे. वीजपुरवठा खंडित झाल्यास नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत होते. वादळी वाऱ्यासह जोरदार पावसामुळे घरांचे, शाळांचे आणि अंगणवाड्यांचे पत्रे उडून गेले आहेत, तसेच वीज खांब पडल्याने वीजपुरवठा खंडित होत आहे. या समस्येवर लवकरात लवकर तोडगा काढण्याची मागणी युवासेना जिल्हा प्रमुख तथा माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश चौधरीयांनी केली आहे.
निवेदनात नमूद केले आहे की, राज्याने खासगी उद्योग समूहासोबत करार करून महावितरणाच्या जुन्या मीटरऐवजी नवी मीटर बसविण्याची मोहीम हाती घेतली आहे. त्यासाठी त्या उद्योग समूहाने नोकर भरतीही केल्याचे समजते. प्रायोगिक तत्त्वावर शासकीय कार्यलयात अशी मीटर बसवली जात आहेत. राज्य विद्युत मंडळ आणि महावितरण ही शासनाची अधिकृत कंपनी असताना त्या समूहासोबत असा करार करून स्मार्ट व प्रीपेड मीटरची सक्ती का, असा आमचा सवाल आहे. राज्य विद्युत मंडळ आणि महावितरण कंपनीने प्रस्थापित केलेली सर्व यंत्रणा, पायाभूत सुविधा, इन्फ्रास्ट्रक्चर संबंधित कंपनीला आंदन देण्याचाच हा प्रकार आहे. त्यामुळे महावितरण आणि राज्य विद्युत मंडळ त्या कंपनीच्या घशात घातले जाणार आहे. यात नेमके कोणाचे हित साधले जाणार आहे, या संपूर्ण प्रक्रियेलाच आमचा तीव्र विरोध आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी तत्कालीन ऊर्जामंत्री आणि आताचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्मार्ट आणि प्रीपेड मीटर घरगुती ग्राहकांना बसविले जाणार नसल्याचे अधिवेशनात जाहीरपणे सांगितले होते; पण निवडणुका झाल्यानंतर मात्र स्मार्ट आणि प्रीपेड मीटर नवीन कनेक्शन आणि नादुरुस्त मीटरच्या नावाखाली बसवायला सुरुवात झाली आहे. याला जनतेचा तीव्र विरोध आहे. याबरोबरच निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राज्याने साडेसात अश्वशक्तीपर्यंत शेतीपंपांना संपूर्ण वीज बिल माफ करण्याची घोषणा केली होती. ही घोषणा फक्त कागदावरच राहणार आहे का, कारण साडेसात हॉर्स पॉवरच्या वीज पंपांना विद्युत कनेक्शनऐवजी सोलर सक्ती केली जात आहे. डोंगराळ आणि अति पावसाच्या भागात सोलर सक्ती ही शेतकऱ्यावर अन्याय करणारी आहे. तरी ही सक्ती मागे घेऊन मागेल त्या शेतकऱ्याला वीज कनेक्शन मिळाले पाहिजे.’
या सर्व समस्याकार्यकारी अभियंता यांना निवेदनात म्हटले आहे
यांची होती उपस्थित
शिवसेना उपनेते रावेर लोकसभा नंदुरबार जिल्ह्याचे संपर्कप्रमुख गुलाबराव जी वाघ युवा सेना जिल्हाप्रमुख मा नगराध्यक्ष निलेश चौधरी उपजिल्हा संघटक राजेंद्र ठाकरे शहर प्रमुख भागवत चौधरी मा नगरसेवक उमेश महाजन तालुकाप्रमुख जयदीप पाटील शेतकरी सेनेचे तालुकाप्रमुख विजय पाटील उप तालुका प्रमुख रणजीत सिंग शिखरवार युवा सेनेचे उपजिल्हाप्रमुख हेमंत महाजन युवा सेनेचे शहर प्रमुख परमेश्वर महाजन राहुल रोकडे प्रेमराज चौधरी किशोर महाजन विनोद रोकडे ज्ञानेश्वर महाजन प्रसिद्धीप्रमुख गजानन महाजन बापू महाजन फिरोज पटेल नंदू भाई कोरोशिया सचिन चव्हाण संतोष सोनवणे रमेश चव्हाण व्यापारी सेनेचे दिनेश येवले यांच्यासह सर्व उद्धव साहेब बाळासाहेब ठाकरे धरणगाव शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.