पुणे (वृत्तसंस्था) पुण्यातील मुंडवा भागातील एका हॉटेलमध्ये राष्ट्र ध्वजाचा अवमान केल्याप्रकरणी वाद्यवृंदातील गायिका आणि आयोजकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे प्रकरण स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला सोमवारी मुंडवा येथील एका पबमध्ये घडले.
याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, पुण्याचं उपनगर मुंढवा इथल्या एका पबमध्ये रविवारी म्युझिकल कॉन्सर्टचं आयोजन करण्यात आलं होतं. यातील गायिका उमा शांतीने परफॉर्मन्सदरम्यान तिरंगा फडकावत तो प्रेक्षकांच्या दिशेने भिरकावला होता. त्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी याप्रकरणी गायिका पोलीस आणि आयोजकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान, गायिकेच्या दोन्ही हातांमध्ये तिरंगा झेंडा होते, यावेळी उत्साहाच्याभरात गायिकेने तिरंगा झेंडा प्रेक्षकांमध्ये भिरकावला. तिची ही कृती राष्ट्रध्वज हाताळण्याच्या आचारसंहितेत बसणार नव्हती. याबाबतचे वृत्त आज एका दैनिकाने दिले आहे.
















