चाळीसगाव (प्रतिनिधी) तुम्ही फक्त निवडून द्या, आमदार मंगेश चव्हाण यांना मोठं करण्याचं काम आम्ही करू, अशा शब्दात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी चाळीसगाव तालुक्याला मंत्रीपदाचे संकेत दिले आहेत.
आ. मंगेश चव्हाण यांनी केलेल्या कामकाजाची सुची मागविली तेव्हा मला धक्का बसला असून त्यांनी केलेल्या कामांची सूची आमच्या मतदार संघातील लोकांनी वाचली तर, मला निवडणूक लढवितांना अडचणी येतील असे आ. चव्हाणांच्या कामांचे कौतूक देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी केले. तसेच तुम्ही मंगेश चव्हाण यांना निवडून द्या, त्यांना मोठं करण्याचे काम आम्ही करू, अशी ग्वाही अमित शाह यांनी चाळीसगाव येथील प्रचार सभेत दिली. चाळीसगाव येथील महायुतीचे उमेदवार आ. मंगेश चव्हाण यांच्या प्रचार सभेत ते बोलत होते. पुढे बोलतांना ते म्हणाले की, अतिशय तरुण दमदार आमदार तुम्हाला मिळाला आहे. चाळीसगावात दोन अडीच वर्षात केलेली विकास कामे ही खरोखर कौतूकास्पद आहे, २३०० कोटींची कामे त्यांनी मतदार संघात केली आहेत.
एका छोटश्या विधानसभा मतदार संघात इतकी कामे त्यांनी केली आहे. ना. गिरीष महाजन व मंगेश चव्हाण यांनी वरखेडे-लोंढेचे थांबलेले काम पुर्ण केले असून याप्रकल्पाद्वारे ८ हजार २०० हेक्टर शेतजमिन ओलीताखाली येणार आहे. सर्व सरकारी कार्यालयांसाठी प्रशासकीय इमारत, आरटीओ कार्यालय त्यांनी आणले, चाळीसगाव, संभाजीनगर, जळगाव, नाशिक रस्त्यांची कामे त्यांनी केली. अमृत भारत अंतर्गत रेल्वेस्टेशनचा विकास ते करत आहेत, त्यामुळे एक व्हिजन व दुरदृष्टी असलेला नेता तुम्हाला मिळाला आहे. म्हणून त्यांना विक्रमी मतांनी निवडून द्या, असे आवाहन अमित शाह यांनी केले.
एकाला मोठं केलं पण तो बेईमान निघाला ; गिरीश महाजन !
गिरीश महाजन आम्ही या अगोदर देखील एकाला असाच जीव लावला होता आणि आमदार, खासदार केला पक्षाने पण तो बेईमान निघाला असून गेल्या दहा वर्षात त्यांने कोणतेच कामं केलें नाही म्हणून आम्ही गेल्या लोकसभा निवडणुकीत तिकिट नाकारले अशा शब्दांत मंत्री गिरीश महाजन यांनी उन्मेष पाटील यांचे नाव न घेता टोला लगावला. मंगेश चव्हाण यांनी जनतेच्या भल्यासाठी भांडून निधी खेचून आणला असून त्यांना पुन्हा भरघोस मतांनी निवडून द्या, त्यांना मोठं करू असे ना. महाजन म्हणाले.