यावल (प्रतिनिधी) तालुक्यातील अट्रावल येथे महापुरूषांच्या पुतळ्याची विटंबना केल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आल्यानंतर गावात मोठा तणाव निर्माण झाला होता. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थितीवर नियंत्रण मिळवले.
यावल तालुक्यातील अट्रावल येथे सुमारे दहा-बारा जणांच्या जमावाने आज पहाटेच्या सुमारास महापुरूषांच्या पुतळ्याची तोडफोड करून विटंबना केल्याचा प्रकार आल्यानंतर गावात मोठा तणाव निर्माण झाला होता. यानंतर दोन गटांमध्ये दगडफेकीसह तुफान हाणामारी झाली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन वातावरण निवळण्याचा प्रयत्न केला. अतिरिक्त कुमक मागविण्यात आल्याने लवकरच वातावरण नियंत्रणात आले. दरम्यान, परिस्थिती नियंत्रणात असून कुणीही अफवा पसरवू नये असे आवाहन पोलिसांनी केली आहे.