जळगाव (प्रतिनिधी) येथील मू.जे. महाविद्यालयाच्या स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयातील वादविवाद मंडळाचे उद्घाटन डॉ.देवानंद सोनार (संचालक, सोहम योग व निसर्गोपचार विभाग, मू. जे. महाविद्यालय ) यांचे शुभहस्ते झाले. यावेळी अन्नमयकोश , प्राणमय, मनोमयकोश विज्ञानमय कोश आणि आनंदमय कोश यांच्या विकासातून व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास साधता येतो. तसेच व्यक्तीचे बाह्यांग व अंतरंगाचा विकास म्हणजेच व्यक्तिमत्व विकास होय. बुद्धी, चित्त, वृत्ती आणि मनाची शुद्धी करून वैचारिकदृष्ट्या आपण समृद्ध होत जातो. त्यासाठी चांगल्या सवयी नियमित योग व प्राणायाम सूर्यनमस्कार वाचन, मनन, चिंतन यांची कास विद्यार्थ्यांनी धरली पाहिजे. असा संदेश त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.
योग व व्यक्तिमत्त्व विकास या विषयावर ते बोलत होते. याप्रसंगी विविध यौगिक क्रियांचे प्रात्यक्षिक त्यांनी विद्यार्थ्यांना दिले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून उपप्राचार्य प्रा. करुणा सपकाळे तर प्रमुख अतिथी म्हणून प्रा.स्वाती बऱ्हाटे उपस्थित होत्या. कार्यक्रमाची प्रास्ताविक वाद-विवाद मंडळ प्रमुख गणेश सूर्यवंशी यांनी केले. कु.समीक्षा माकोडे हिच्या स्वागत गीताने कार्यक्रमाचा शुभारंभ झाला. पाहुण्यांचा परिचय प्रा. ईशा वडोदकर तर फलक लेखन प्रा.छाया पाटील यांनी केले. प्रा.छाया चौधरी व प्रा. वर्षा पाटील यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.पूजा सायखेडे यांनी केले. तसेच कार्यक्रमाच्या नियोजनासाठी प्रा.अर्चना जाधव, डॉ.श्रध्दा पाटील, प्रा.हेमंत पिंपळे , प्रा.पल्लवी फिरके, प्रा.प्रवीण महाजन. प्रा.अर्जुन मेटे, प्रा.प्रज्ञा पाटील , श्री.चेतन वाणी आदींनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमासाठी विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.