धरणगाव (प्रतिनिधी) धरणगाव शहरासाठी वाढीव पाणीपुरवठा योजनेच्या पहिल्या टण्याच्या चाचणीचे मुख्याधिकारी तथा प्रशासक जनार्दन पवार यांच्या हस्ते ६ रोजी शुभारंभ करण्यात आला.
महाराष्ट्र सुवर्ण जयंती महाअभियान अंतर्गत धरणगाव शहरात पाणीपुरवठा वितरण वाहिनीचे काम प्रगतीपथावर आहे. या योजनेच्या पहिल्या टप्यात पालिकेच्या जलकुंभावरून नवीन वितरण वाहिनीद्वारे ५ जूनपासून शहरातील परिहार चौक, बेरदार मोहल्ला, डी. डी. पवार चौक, मेन रोड, कोर्ट बाजार भावे गल्ली, भाटिया गल्ली, लांडगे गल्ली, गुजराथी गल्ली, मला कली, अग्निहोत्री गल्ली, कासार गल्ली, परिहार नगर, नेहरूनगर, मेन रोड, अर्बन बँक रस्ता, नवेगाव, तेली तलाव परिसर, लहान माळीवाडा पोलिस लाइन, संजय नगर, सोनवद रस्ता व घनकचरा प्रकल्प या भागात पाणीपुरवठा केला जाणार आहे.
मुख्याधिकारी तथा प्रशासक जनार्दन पवार यांच्या हस्ते पहिल्या टप्यातील पाणी वितरण वाहिनीच्या चाचणीला सुरुवात करण्यात आली. या वेळी कार्यालय अधीक्षक संजय मिसर, बांधकाम अभियंता सुमित पाटील, प्रवीण पाटील, श्रीकांत बिराडे, ज्ञानेश्वर दिघोळे, तुषार सोनार, सुमित पाटील तसेच पालिका अधिकारी व कर्मचारी, मक्तेदाराचे प्रतिनिधी स्वप्निल पाटील व शहरातील नागरिक उपस्थित होते. दरम्यान, शहरातील उर्वरित भागातील पाणी वितरण वाहिनीचे काम प्रगतीपथावर असून लवकरच काम पूर्ण करून चाचणी घेण्यात येईल..