धरणगाव (प्रतिनिधी) तहसील कार्यालय, आरोग्य विभाग व वर्ल्ड व्हिजन इंडिया यांच्या संयुक्त विद्यमानाने धरणगाव तालुक्यात बाल विवाह प्रतिबंध अभियानाचे उद्घाटन करण्यात आले. जळगाव येथे १६ रोजी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद व उपविभागीय दंडाधिकारी मनीषकुमार गायकवाड यांच्या आदेशानुसार तहसीलदार महेंद्र सूर्यवंशी यांच्या हस्ते बाल विवाह रोखथाम अभियानाचे उद्घाटन करण्यात आले.
बाल विवाह प्रतिबंध कायदा – २००६ची चळवळ, या बाल विवाह थांबवणे व लोकांमध्ये जनजागृती निर्माण करणे तसेच जे गावातील लोक बाहेर गावी कामाला जातात, ज्या बालकांनी शाळा सोडली असेल किंवा अति गरीब कुटुंबाकड़े जास्त लक्ष देणे, त्यांना जागृत करणे, त्याचप्रमाणे लोकांना शिक्षेबाबत सांगणे, याबाबत गट शिक्षणाधिकारी भावना भोसले यांनी माहिती दिली. त्याचप्रमाणे वर्ल्ड व्हिजन इंडियाचे प्रकल्प अधिकारी जितेंद्र गोरे यांनी बाल विवाह प्रतिबंध कायद्याचे पालन कसे करता येईल व कोणतेही मुले हे बाल विवाहाला बळी पड़ल्यास कोणती तरतूद करावी व १०९८ आणि ११२ हेल्पलाइनवर कॉल करण्याबाबत माहिती दिली.
गुड़ टच, बॅड टचबाबत डॉ. संजय चौहान यांनी मार्गदर्शन केले. वर्ल्ड व्हिज़न इंडियाच्या माध्यमाने शपथ घेण्यात आली. शेवटी हस्ताक्षर अभियान राबवण्यात आले. वर्ल्ड व्हिजन इंडियाच्या माध्यमाने प्रत्येक गावात बाल विवाह प्रतिबंधक पोस्टर महेंद्र सूर्यवंशी यांच्या हस्ते सर्व आशा सेविकांना वाटप करण्यात आले. कार्यक्रमास धरणगावचे तहसीलदार, गट विकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी व टीम, पोलिस उप निरीक्षक, गट शिक्षणाधिकारी, सीडीओ, वर्ल्ड व्हिजन इंडियाचे सर्व सदस्य, आशा संयोगनी व सुपरवाइजर उपस्थित होते.