TheClearNews.Com
Sunday, May 31, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

दिव्यांगत्व प्रमाणपत्र एक आठवड्यात देण्यात यावे,टोकन पद्धत बंद करा ; महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मागणी !

The Clear News Desk by The Clear News Desk
March 16, 2023
in आरोग्य, जळगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) येथील वैद्यकीय महाविद्यालयामध्ये दर बुधवारी जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांची तपासणी केल्यानंतर त्यांना दिव्यांगत्व प्रमाणपत्र तातडीने देण्याची नियमावली आहे. मात्र तपासणी करता आलेल्या दिव्यांग बांधवांना तीन किंवा चार महिन्यांची पुढची तारीख दिली जात असल्याची धक्कादायक बाब महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने निदर्शनास आणलेली आहे. त्याबाबत महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.ठाकूर व जिल्हा रुग्णालयाचे शल्यचिकित्सक डॉ. किरण पाटील यांच्याशी संपर्क साधून दिव्यांग बांधवांना न्याय द्यावा याकरता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष ॲड.जमील देशपांडे यांच्यासह मनसे पदाधिकारी यांनी बुधवारी चर्चा केली.

दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम २०१६( शासन निर्णय क्रमांक अप्रवि २०१८/प्र. क.४६/ आरोग्य ६) नुसार दिव्यांगत्व तपासणी मूल्यमापन व प्रमाणपत्र वितरणासाठी शासनातर्फे मार्गदर्शक सूचना करण्यात आलेली आहे. मात्र या सूचनांना केराची टोपली दाखवण्याचे काम वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय यांच्याकडून होत असून जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांवर खूप मोठा अन्याय होत आहे. मार्गदर्शक सूचनेनुसार जिल्हा सामान्य रुग्णालय, उपजिल्हा ग्रामीण रुग्णालय, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, महानगरपालिका रुग्णालय या ठिकाणी दिव्यांग बांधवांची तपासणी करावी व त्यांना मूल्यमापन व प्रमाणपत्र वितरीत करावे असे स्पष्ट आदेश आहेत.

READ ALSO

Weekly Horoscope : साप्ताहिक राशीभविष्य 1 ते 7 जून 2026 !

जैन हिल्स येथे फाली-१२ वार्षिक अधिवेशन

जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये दिव्यांगत्व तपासणी होणे अपेक्षित आहे. मात्र चाळीसगाव, मुक्ताईनगर, चोपडा, जामनेर याठिकाणीच तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात येते व त्याकरता सुद्धा जळगाव येथूनच डॉक्टर जात असतात. याबाबत अधिक विचारणा केली असता कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्यामुळे पंधरा तालुक्याच्या ठिकाणी तपासणी शिबिर करता येऊ शकत नाही अशी माहिती याप्रसंगी मिळाली.

दरम्यान शासकीय महाविद्यालय जळगाव येथे सर्व प्रकारच्या तपासण्या होत असल्यामुळे दिव्यांग बांधव जळगाव मध्येच येतात. ज्यांना नोकर भरती किंवा इतर शासकीय योजना करता दिव्यांगत्व प्रमाणपत्राची गरज असेल तर त्याकरता तीन किंवा चार महिने प्रतीक्षा करावी लागते ही अतिशय गंभीर बाब आहे. एकीकडे शासन दिव्यांग मंत्रालय बनवण्याच्या घोषणा करत असून दुसरीकडे दिव्यांग बांधवांना तारीख पे तारीख देऊन प्रताडीत केले जात आहे. बुधवारी येणाऱ्या दिव्यांग बांधवांना शासकीय महाविद्यालयाकडून अगोदरच तारीख टाकून ठेवलेले टोकन विचारीत केले जातात. सदर टोकन पद्धती तातडीने बंद करावी असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दिलेला आहे.

जिल्ह्यातील ज्या बांधवांना दोन-तीन महिने पुढील तारखा मिळालेले आहेत त्या सर्वांना घेऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेना अतिशय आक्रमक पद्धतीने आंदोलन करणार असल्याची माहिती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष ॲड.जमील देशपांडे यांनी दिली आहे. याप्रसंगी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहर अध्यक्ष किरण तळले, उपशहर अध्यक्ष ललित शर्मा, सतीश सैंदाणे, चेतन पवार, जनहित जिल्हा उपसंघटक राजेंद्र निकम, विभाग अध्यक्ष साजन पाटील, जनहित शहर अध्यक्ष प्रशांत बाविस्कर, किरण सपकाळ, खुशाल ठाकूर, उपस्थित होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

सामाजिक

Weekly Horoscope : साप्ताहिक राशीभविष्य 1 ते 7 जून 2026 !

May 31, 2026
जळगाव

जैन हिल्स येथे फाली-१२ वार्षिक अधिवेशन

May 30, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 30 फेब्रुवारी 2026 !

May 30, 2026
धरणगाव

धरणगावात मोफत मोतीबिंदू शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद…!

May 29, 2026
यावल

गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या युवा संस्कार शिबिरात रोटरी वाचन कट्टा

May 29, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 29 मे 2026 !

May 29, 2026
Next Post

अमृता फडणवीस यांना ​​​​​​​ब्लॅकमेलिंगचा प्रयत्न ?; देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली सविस्तर माहिती !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

भुसावळ नगरपालिका हद्दीत धूर फवारणीबाबत मुख्याधिकाऱ्यांना निवेदन !

October 17, 2021

‘त्या’ वक्तव्याप्रकरणी इंदुरीकर महाराजांना न्यायालयाचा तब्बल ८ महिन्यांनंतर दिलासा

March 30, 2021

शेकोटीत पडलेल्या चिमुकल्याचा उपचारादरम्यान मृत्यू

January 22, 2025

जळगाव शहरातील महामार्ग चौपदरी कॉन्क्रीटचा प्रस्ताव ; नितीन गडकरींचे नागरिकांच्या शिष्टमंडळास आश्वासन !

September 2, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group