TheClearNews.Com
Monday, July 20, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

अमृता फडणवीस यांना ​​​​​​​ब्लॅकमेलिंगचा प्रयत्न ?; देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली सविस्तर माहिती !

फॅशन डिझायनर तरुणी पोलिसांच्या ताब्यात; जाणून घ्या...काय आहे नेमकं प्रकरण?

The Clear News Desk by The Clear News Desk
March 16, 2023
in गुन्हे, राजकीय, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Davendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांना एका फॅशन डिझायनर महिलेने आधी एक कोटी रुपयांची लाच देण्याची ऑफर केली. मात्र, अमृता फडणवीस यांनी या महिलेला हुसकावून लावल्यानंतर तिने त्यांना ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे अमृता यांनी अखेर पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचे आज विधानसभेत पडसाद उमटले. सदस्यांनी प्रश्न उपस्थित करताच फडणवीस यांनी या घटनेची सविस्तर माहिती सभागृहाला दिली.

राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विधानसभेत या प्रकरणाबाबत प्रश्न मागताच देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत अनेक धक्कादायक खुलासे केले. देवेंद्र फडणवीस यांच्या माहितीनंतर मलबार हिल पोलिसांचे पथक उल्हासनगरमध्ये दाखल झाले होते. विधानसभेत देवेंद्र फडणवीस यांनी अनिल जयसिंघानिया नावाच्या व्यक्तीचे नाव घेतले होते. पोलिसांनी अनिल जयसिंघानिया यांच्या घरी पोहोचत त्यांच्या घराची झाडाझडती सुरु केली. यानंतर पोलिसांनी अनिक्षाला ताब्यात घेतले.

READ ALSO

भुसावळातील इलेक्ट्रिक व्यावसायिकाचा सायबर ‘गेम’

क्लास चालकाची ७ लाखात फसवणूक

माझ्या पत्नीने या प्रकरणाचा एक एफआयआर दाखल केला आहे. तिच्यावर दबाव आणून माझ्यामाध्यमातून काम करून घेण्याचा प्रयत्न झाला. आधी पैशाची ऑफर दिली. नंतर ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करण्यात आला. अनिल जयसिंघांनी नावाचा एक व्यक्ती गेल्या सात ते आठ वर्षापासून फरार आहे. त्याच्यावर 14 ते 15 गुन्हे आहेत. त्याची एक मुलगी आहे. शिकलेली आहे. हुशार आहे. ही मुलगी 2015-16च्या दरम्यान अमृताला भेटत होती. नंतर तिचं येणं बंद झालं. अचानक 2021मध्ये या मुलीनं माझ्या पत्नीला भेटणं सुरू केलं, असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.

मागच्या सरकारने माझ्या वडिलांना सोडवण्याचे प्रयत्न सुरू केले होते. पण सरकार बदलल्याने ती प्रक्रिया थांबली. तुम्ही ते बंद केलं. म्हणून आम्हाला तुम्हाला ब्लॅकमेल करावं लागलं, असं या मुलीने सांगितलं. हे सांगताना त्यांनी काही बड्या नेत्यांची नावं घेतली. मी ती नावं घेणार नाही. मला राजकारण करायचं नाही. कारण अशा आरोपींवर किती विश्वास ठेवायचा हा सुद्धा एक प्रश्न आहे. पण प्रकरण गंभीर आहे. हे कुणाही बाबतीत घडू शकतं, असं फडणवीस म्हणाले.

या आरोपींनी काही व्हिडीओ पाठवले. राजकीय नेत्यांसोबतचे आमचे कसे संबंध आहेत हे दाखवण्यासाठी त्यांनी हे व्हिडीओ पाठवले. आमचे सर्वच पक्षातील नेत्यांसोबत ओळख आहे. तुम्ही मदत नाही केली तर आम्ही त्यांना ही माहिती देऊ, अशी ब्लॅकमेलिंग त्यांनी सुरू केली. आम्हाला ट्रॅपमध्ये अडकवण्याचा हा प्रयत्न होता, असंही ते म्हणाले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

भुसावळातील इलेक्ट्रिक व्यावसायिकाचा सायबर ‘गेम’

July 20, 2026
गुन्हे

क्लास चालकाची ७ लाखात फसवणूक

July 20, 2026
गुन्हे

गुंतवणुकीवर मोठ्या नफ्याचे अमिष दाखवत निवृत्त बँक अधिकाऱ्याला साडेसात लाखांचा गंडा

July 19, 2026
गुन्हे

लिंकला क्लिक करताच व्यावसायिकाचा मोबाईल हॅक

July 18, 2026
गुन्हे

धावत्या लक्झरीमधून २५ लाखांची बॅग चोरीचा पर्दाफाश; पाच अटकेत

July 17, 2026
अमळनेर

महिलेला पळवून नेत केला अत्याचार; आरोपीला अटक

July 17, 2026
Next Post

अमळनेरातील कुख्यात गुंड विशाल सोनवणेवर एमपीडीएची कारवाई !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

‘कुठला डॉन आणि कुठला कोण?, माझ्या नादी लागल्यास..’ ; तरुणीचा गुंडागिरी करतानाचा व्हिडिओ व्हायरल

January 16, 2022

ब्रेकिंग न्यूज : आ. गिरीश महाजन यांच्याविरुद्ध दाखल गुन्ह्याची होणार सीबीआय चौकशी !

July 23, 2022

एक्सक्ल्युझिव्ह : वाचा…’मविप्र’वाद प्रकरणी अ‍ॅड. विजय पाटील यांनी दिलेली संपूर्ण फिर्याद !

January 5, 2021

ठेवीचा प्रश्न मार्गी लावा अन्यथा मुख्यमंत्र्यांच्या दारात एकत्रित येऊन आत्मदहन करू

December 9, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group