धरणगाव (प्रतिनिधी) शहरातील अंगणवाडी क्रं१३३/ हनुमान नगर येथे नुकतीच स्वस्थ बालक स्पर्धा घेण्यात आली.
धरणगाव येथील प्रभाग क्रमांक ६ मधील एकात्मिक बाल विकास प्रकल्प नागरी अंगणवाडी क्रं.१३३ हनुमान नगर येथे पोषण महीना स्वस्थ बालक स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत परीसरातील सर्व बालकांनी भाग घेतला.
यावेळी प्नभाग ६ च्या नगरसेविका संगिता गुलाब मराठे यांच्या हस्ते बालक हर्षल विकास माळी व प्रन्येश भाष्कर चौधरी यांना बक्षीस वितरण करण्यात आले. स्पर्धच्या यशस्वीतेसाठी अंगणवाडी सेविका वंदना कंखरे मँडम मदतनिस संगिता चव्हाण यांनी परीक्ष्रम घेतले.