TheClearNews.Com
Thursday, July 23, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

प्रतिबंधित सिमी संघटनेची सुधारीत आवृत्ती म्हणजे पीएफआय?

जाणून घ्या...पीएफआय आहे तरी काय? आणि सिमीसोबत तिचं कनेक्शन नेमकं का जोडलं जातं?

The Clear News Desk by The Clear News Desk
September 22, 2022
in गुन्हे, जळगाव, राजकीय, राज्य, राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) आज देशभरात राष्ट्रीय तपास यंत्रणा, स्थानिक पोलीस आणि ईडीच्या पथकाने पीएफआयच्या कार्यालयांवर संयुक्त कारवाई केली. मुळात पीएफआय ही संघटना ही बंदी घातलेल्या सिमी या संघटनेची सुधारीत आवृत्ती असल्याचा आरोप होत असतो. त्यामुळे आता देशांतर्गत सुरक्षेचा विषय पुन्हा चर्चेत आला असून सिमीनंतर आता पीएफआयवर बंदी येणार अशी चर्चा सुरु झाली आहे.

पीएफआय आहे तरी काय?

READ ALSO

सुनसगाव रस्त्यावरील शेतात सुरु असलेल्या कुंटणखान्यावर छापा

एसी सर्व्हिस सेंटर चालकाला साडेनऊ लाखात ऑनलाईन गंडविले

2006 मध्ये पीएफआय या संघटनेची स्थापना करण्यात आली होती. या स्थापनेच्या वेळेस नॅशनल डेव्हलपमेंट फ्रंटचे विलिनीकरण करण्यात आले. एनडीएफसोबत मनिथा निथी परसराई, कर्नाटक फोरम फॉर डिग्निटी आणि अन्य संघटनेचे विलिनीकरण झाले होते. या संघटना मुस्लिम कट्टरतावादी संघटना असल्याचे म्हटले जाते. 1992 मध्ये बाबरी मशिद पाडण्यात आल्यानंतर केरळमध्ये 1993 मध्ये नॅशनल डेमोक्रॅटिक फ्रंट या संघटनेची स्थापना करण्यात आली होती. मात्र, 2012 मधील केरळ सरकारच्या एका अहवालानुसार, पीएफआय ही संघटना बंदी घातलेल्या सिमी या संघटनेची सुधारीत आवृत्ती असल्याचा आरोप आहे.

पीएफआयचे 20 राज्यांमध्ये युनिट्स 

पीएफआय आपल्या सदस्यांच्या संख्येची माहिती देत ​​नाही. तथापि, 20 राज्यांमध्ये त्यांची युनिट्स असल्याचा दावा केला जातो. सुरुवातीला, पीएफआयचे मुख्यालय केरळमधील कोझिकोड येथे होते, परंतु नंतर ते दिल्लीला हलविण्यात आले. ओएमए सलाम हे त्यांचे अध्यक्ष आणि ईएम अब्दुल रहिमन हे उपाध्यक्ष आहेत. PFI चा स्वतःचा गणवेश देखील आहे. दरवर्षी 15 ऑगस्ट रोजी पीएफआय स्वातंत्र्य परेडचे आयोजन करते. 2013 मध्ये केरळ सरकारने या परेडवर बंदी घातली होती. कारण PFI च्या गणवेशात पोलिसांच्या गणवेशाप्रमाणे तारे आणि चिन्हे होते, असे एका मिडिया रिपोर्टमध्ये छापून आले आहे.

पीएफआय आणि सिमी कनेक्शन !

दहशतवादी कृत्यात सहभागी असल्याने सिमी या संघटनेवर बंदी घालण्यात आली होती. त्यानंतर सिमीने इतर संघटनांच्या माध्यमातून काम सुरू ठेवल्याची चर्चा होती. पीएफआय आणि सिमीचे कनेक्शन असल्याचा दावा सातत्याने केला जातो. पीएफआयच्या स्थापनेच्या वेळेस विलिनीकरण झालेल्या काही संघटना या सिमीशी संबंधित असल्याचे म्हटले जात होते. तर, पीएफआयचे काही पदाधिकारी हे सिमीचे पदाधिकारी, सक्रिय कार्यकर्ते होते, असाही दावा करण्यात आला होता. पीएफआयचे राष्ट्रीय अध्यक्ष अब्दुल रहमान हे यापूर्वी सिमीचे राष्ट्रीय सचिव होते.

तेव्हापासूनच पीएफआयवर सिमीचे दुसरे रूप असल्याचा आरोप

सिमीवर 2001 मध्ये बंदी घालण्यात आली होती. तेव्हापासून पीएफआयवर सिमीचे दुसरे रूप असल्याचा आरोप होत आहे. इंडियन मुजाहिदीन या अतिरेकी संघटनेशीही सिमीचे संबंध आहेत. यामुळेच सिमी आणि पीएफआय यांच्यातील संबंध देखील दर्शविला जातो. कारण अनेक माजी सिमी सदस्य आता पीएफआयमध्ये सक्रिय असल्याचे बोलले जाते. काही लोकांचा असा विश्वास आहे की, जेव्हा सरकारने सिमीवर बंदी घातली होती, तेव्हा सिमीच्या माजी सदस्यांनी ही संघटना दुसऱ्या नावाने सुरू केली होती. SIMI वर बंदी घातल्यानंतर 6 वर्षांनीच PFI ची स्थापना झाली होती.

थोडक्यात जाणून घेऊ सिमी इतिहास !

‘स्टुंडट्स इस्लामिक मूव्हमेंट ऑफ इंडिया’ या संघघटनेवर दहशतवादी कृत्यात सहभागी असल्याच्या कारणास्तव बंदी घालण्यात आली आहे. 2018 मध्ये या संघटनेवरील बंदीचा कालावधी संपला होता. मात्र, त्यानंतर पुन्हा पाच वर्षांसाठी ही बंदी वाढवण्यात आली. उत्तर प्रदेशातील अलिगडमध्ये या संघटनेची 1977 मध्ये स्थापना करण्यात आली होती. जमात-ए-इस्लामिक हिंद या संघटनेची विद्यार्थी संघटना म्हणून सिमीची ओळख होती. भारतात झालेल्या दहशतवादी कारवायांमध्ये सिमीचा सहभाग असल्याचे समोर आल्यानंतर 2001 मध्ये बंदी घालण्यात आली होती.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

सुनसगाव रस्त्यावरील शेतात सुरु असलेल्या कुंटणखान्यावर छापा

July 23, 2026
गुन्हे

एसी सर्व्हिस सेंटर चालकाला साडेनऊ लाखात ऑनलाईन गंडविले

July 22, 2026
जळगाव

अ.भा.मराठी नाट्यपरिषद जळगाव जिल्हा शाखेतर्फे

July 21, 2026
जळगाव

स्मार्ट मीटरसंदर्भातील शंकांचे महावितरणकडून निरसन

July 21, 2026
जळगाव

नाट्यरंग जळगावच्या ‘गाठोड्याचं गुपित’ बालनाट्याचा शिरसोलीत २८ वा प्रयोग यशस्वी संपन्न; ७०० विद्यार्थ्यांनी घेतला नाट्यानंद

July 21, 2026
धरणगाव

कै. भवरलाल जैन वाचनालय तर्फे साकरे येथील जिल्हा परिषद शाळेत मोफत वह्या वाटप..!

July 21, 2026
Next Post

काय सांगता ! उपोषणकर्ते धामोडे यांच्याविरुद्ध मोबाईल चोरीची तक्रार देणाऱ्याचे घुमजाव

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

बापरे ! प्रेयसीचं दुसऱ्याशी लग्न ठरलं ; नंतर प्रियकरानं जे केलं ते भयंकरच

June 1, 2022

धरणगाव शहरात ‘स्वच्छता ही सेवा’ अंतर्गत स्वच्छता अभियान !

October 2, 2023

सलमान खानला शस्त्र परवाना मंजूर ; मिळाली होती जीवेठार मारण्याची धमकी !

August 1, 2022

महाराष्ट्र कायदेशीर सल्लगारपदी ऍड.प्रविण पाटील

September 7, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group