जळगाव (प्रतिनिधी) लाचप्रकरणी गट शिक्षणाधिकारी अशोक बिऱ्हाडे व कत्राटी शिक्षणतज्ज्ञ तुळशीराम सैंदाणे या दोघांना आज न्यायालयाने अंतरिम जामीन दिला आहे.
आरटीई अंतर्गत शाळेस अनुदान मिळण्यासाठी दोन हजार रुपयांची लाच घेणाऱ्या गट शिक्षणाधिकारी अशोक बिऱ्हाडे व कत्राटी शिक्षणतज्ज्ञ तुळशीराम सैंदाणे या दोघांना सोमवारी लाचलुचपत प्रतिबंध विभागाने रंगेहात अटक केली होती. त्यानंतर दोघांविरुद्ध धरणगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. अटक केल्यानंतर मंगळवारी दोघांना न्यायालयात हजर करण्यात आले होते. सुनावणीअंती दोघांना एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती. पोलीस कोठडी संपल्यानंतर दोघांना आज (बुधवार) पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने दोघांना अंतरिम जामीन मंजूर केला आहे.