TheClearNews.Com
Sunday, August 30, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

सायकल रॅलीद्वारे विद्यार्थ्यांनी दिला पर्यावरण संवर्धन व सदृढतेचा संदेश

नेहरू युवा केंद्र जळगावतर्फे सायकल दिनानिमित्त भव्य सायकल रॅली

The Clear News Desk by The Clear News Desk
June 3, 2022
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) केंद्र शासनाचा उपक्रम असलेल्या नेहरू युवा केंद्र जळगावतर्फे शुक्रवार दि.३ रोजी जागतिक सायकल दिनानिमित्त जळगाव शहरात भव्य सायकल रॅली काढण्यात आली होती. सायकल रॅलीत सहभागी होत विद्यार्थ्यांनी पर्यावरण संवर्धन आणि सदृढतेचा संदेश दिला. महापौर जयश्री महाजन यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून रॅलीची सुरुवात झाली.

जगभरात दि.३ जून हा जागतिक सायकल दिन म्हणून साजरा केला जातो. केंद्र सरकारचा उपक्रम असलेल्या नेहरू युवा केंद्र जळगावतर्फे शहरात जिल्हास्तरीय सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. रॅलीची सुरुवात महापौर जयश्री महाजन यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून करण्यात आला. पर्यावरण संवर्धन काळाची गरज असून त्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे. दररोज वाहनांमधून निघणाऱ्या धूर आणि विषारी वायूमुळे पर्यावरणाचे मोठे नुकसान होत आहे. पर्यावरणाच्या रक्षणासाठी प्रत्येकाने शक्य तेव्हा वाहनांचा वापर टाळून सायकलचा उपयोग करावा. सध्या इलेक्ट्रिक वाहनांना देखील शासन प्रोत्साहन देत असून आपण देखील त्यांचा वापर करायला हवा, असे आवाहन महापौर जयश्री महाजन यांनी केले आहे.

READ ALSO

जळगाव जिल्हा कृषि औद्योगिक सर्व सेवा सहकारी संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात*

स्मार्ट मीटरमध्ये छेडछाड करून वीजचोरी; ५ जणांसह अज्ञात व्यक्तींवर गुन्हा दाखल

सकाळी ८ वाजता महापौरांनी हिरवी झेंडी दाखविल्यावर शासकीय आयटीआयपासून रॅलीला सुरुवात करण्यात आली. प्रसंग जिल्हा क्रीडा अधिकारी मिलिंद दीक्षित, शासकीय आयटीआयचे प्राचार्य ए.आर.चौधरी, राष्ट्रीय सेवा योजनेचे दीपक कोळी, नेहरू युवा केंद्राचे अजिंक्य गवळी आदी उपस्थित होते.

शासकीय आयटीआयपासून रॅलीला सुरुवात झाल्यानंतर बहिणाबाई उद्यान, प्रभात चौक, आकाशवाणी चौक, स्वातंत्र्य चौक, नवीन बस स्थानकमार्गे कोर्ट चौकातून शिवतीर्थ मैदानावर शासकीय आयटीआयचे प्राचार्य ए.आर.चौधरी यांच्या प्रमुख रॅलीचा समारोप करण्यात आला. यावेळी नेहरू युवा केंद्राचे अजिंक्य गवळी यांनी आभार मानले. सायकल रॅलीत सहभागी विद्यार्थ्यांना थंडपेय देण्यात आले. पर्यावरण बचाव, देश बचाव, सायकल चलाओ, ओझोन बचाओ अशी घोषणा यावेळी विद्यार्थ्यांनी दिल्या. सर्व सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र वाटप केले जाणार आहे.

स्पर्धेसाठी नेहरू युवा केंद्राचे स्वयंसेवक रोहन अवचारे, मनोज पाटील, राहुल जाधव, उमेश पाटील, हेतल पाटील, नेहा पवार, सुष्मिता भालेराव, कल्पना पाटील, चेतन वाणी यांनी परिश्रम घेतले. जळगाव शहरात काढण्यात आलेल्या रॅलीने सर्व नागरिकांचे लक्ष वेधून घेतले होते. रॅलीसाठी जळगाव शहर वाहतूक शाखा, जळगाव जिल्हा सामान्य रुग्णालय, सायकलिस्ट ग्रुप, राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष सहकार्य लाभले. रॅलीत नेहरू युवा केंद्राशी संलग्नित युवा मंडळांचे अध्यक्ष आणि सदस्य देखील सहभागी झाले होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

जळगाव जिल्हा कृषि औद्योगिक सर्व सेवा सहकारी संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात*

August 29, 2026
गुन्हे

स्मार्ट मीटरमध्ये छेडछाड करून वीजचोरी; ५ जणांसह अज्ञात व्यक्तींवर गुन्हा दाखल

August 29, 2026
क्रीडा

शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

August 29, 2026
गुन्हे

कुटुंब देवदर्शनाला अन् चोरट्यांकडून दागिन्यांसह साडेआठ लाख लंपास

August 29, 2026
गुन्हे

डॉक्टराचे कुलूपबंद घर भर दिवसा फोडले

August 29, 2026
चाळीसगाव

स्वच्छता कर्मचाऱ्यांसोबत नगराध्यक्षांनी साजरे केले रक्षाबंधन

August 28, 2026
Next Post

नोकरदारांना सर्वात मोठा धक्का ; EPFO च्या व्याजदरात मोठी कपात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

भडगाव : मामाकडे आलेल्या एकुलत्‍या एक भाच्याचा मृत्यू ; बैलांना पाणी पाजण्यासाठी गेला अन कालव्यात बुडाला !

March 1, 2023

एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे मुख्यमंत्री नाहीत : उद्धव ठाकरे  

July 1, 2022

नवनीत राणांच्या आरोपाचं पितळ उघड ; मुंबई पोलीस आयुक्तांकडून राणा दाम्पत्याचा चहा पितानाचा व्हिडीओ ट्वीट

April 26, 2022

धरणगाव येथे सामाजिक कार्यकर्ते विलास पवार यांचा गौरव

February 6, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group