
जळगाव (प्रतिनिधी) – उधारीचे पैसे घेतल्याच्या कारणावरुन आकाश दत्तात्रय पाटील (वय २२, रा. रायपुर, ता. जळगाव) यांना लाकडी काठीने मारहाण करीत जखमी केले. ही घटना दि. १७ ऑक्टोंबर रोजी रायपुर ग्रामपंचायतजवळ घडली. याप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तालुक्यातील रायपुर ग्रामपंचायतीजवळ आकाश पाटील हा तरुण वास्तव्यास आहे. दि. १७ ऑक्टोंबर रोजी सायंकाळच्या सुमारास आकाशच्या भावाने घेतलेल्या उधारीच्या पैशांवरुन तिघांनी आकाशसोबत वाद घातला. त्यानंतर एका महिलेने आकाशच्या आईला तेथे पडलेली लाकडी काठी डोक्यावर मारुन गंभीर जखमी केले. तसेच तरुणाला चापटा बुक्क्यांनी मारहाण करीत जखमी करुन तुम्ही पैसे कसे देत नाही तुम्हाला पाहून घेते अशी धमकी दिली. दरम्यान, आकाश पाटील याने एमआयडीसी पोलिसात तक्रार दिली असून त्यानुसार तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोहेकॉ गजानन महाजन हे करीत आहे.
















