
पाळधी, ता. धरणगाव (प्रतिनिधी) – धरणगाव येथून चोरीस गेलेली दुचाकी चोरीच्या तपास जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने लावला असून या प्रकरणी मध्य प्रदेशातील एकास कजगाव येथून ताब्यात घेतली आहे.
जगदीश पाटील हे धरणगाव पंचायत समिती येथे कामानिमित्त आले होते. या वेळी त्यांनी त्यांची दुचाकी (डीएल- ०२६८) ही बाहेर लावली होती. काम संपल्यानंतर बाहेर आले तेव्हा त्यांना दुचाकी चोरी झाल्याचे समजले. या संदर्भात त्यांनी धरणगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. या घटनेचा तपास जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने लावून सीसीटीव्ही तपासून मध्य प्रदेशातील रहिवासी व सध्या कजगाव येथे राहणारा मनोज केदार बारेला (रा. हुगाणे ता. सेंधवा) या दुचाकी ताब्यात घेऊन अटक केली. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. राहुल गायकवाड, स.पो.नि. संतोष पवार, हे. कॉ. विष्णू बिऱ्हाडे, दीपक माळी, हरिलाल पाटील, रवींद्र पाटील, रावसाहेब पाटील, राहुल कोळी यांच्या पथकाने केली.
















