जळगाव (प्रतिनिधी) राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने धरणगाव बनावट मद्य निर्मिती प्रकरणातील अटक केलेल्यापैकी चार संशयित आरोपींना न्यायालयाने आज जामीन मंजूर केला आहे.
साई गजानन पार्कमधील भास्कर पांडुरंग मराठे याच्या राहत्या घरात बनावट मद्य निर्मितीचा कारखाना सुरु होता. याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाला मिळाली. त्यानुसार पथकाने छापा टाकून १) गौतम नरेंद्र माळी, वय ३२ वर्षे, रा. थवा, ता. नेत्रंग, जि. भरुच, (गुजरात) ह.मु. साईगजानन पार्क, धरणगाव, ता. धरणगाव, जि. जळगाव २) भुपेंद्र गोकुळ पाटील, वय २९ वर्षे, रा. मराठे गल्ली, धरणगाव, ता. धरणगाव, जि. जळगाव ३) कडु राजाराम मराठे, वय ४० वर्षे, रा. मराठे गल्ली, धरणगाव, ता. धरणगाव, जि. जळगाव ४) भास्कर पांडुरंग मराठे, वय ६३ वर्षे, रा. साई गजानन पार्क, धरणगाव, अशा चार जणांना रंगेहाथ अटक केली होती. त्यानंतर अटकेतील भूपेंद्र पाटील याने दिलेल्या माहितीवरून सचिन पाटील याला पाळधी येथून ताब्यात घेण्यात आले होते. तसेच भूपेंद्र मराठेने दिलेल्या माहितीवरून धारागिर येथे प्लॉट एरियात जनावरांच्या गोठ्यातील कडबा गंजीमध्ये दडवलेले १ लाख ६० हजार रुपये किमतीचे बनावट टॅंगो पंच देशी दारूचे ५५ बॉक्स जप्त करण्यात आले होते.
दरम्यान, आज भुपेंद्र गोकुळ पाटील,कडु राजाराम मराठे,भास्कर पांडुरंग मराठे आणि सचिन पाटील अशा चारही जणांना न्यायालयाने ५० हजाराच्या वयैक्तिक जात मुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे. सचिन पाटील याच्यावतीने अॅड. कुणाल पवार तसेच उर्वरित तिघांच्या वतीने अॅड. सचिन चौधरी यांनी कामकाज पाहिले. जामिनी मिळालेल्या चारही संशयितांना आठवड्यातून एकदा राज्य उत्पादन शुल्कच्या कार्यालयात हजेरी लावण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.