धरणगाव (प्रतिनिधी) येथील 74 होमगार्डस् जवानाचे नुकतेच एचडीएफसी बँकेत खाते वर्ग करण्यात आले आहे.
या सविस्तर वृत्त असे की, जिल्हा समादेशक चंद्रकांत गवळी यांच्या आदेशानुसार व प्रशासकीय अधिकारी सुरेश जाधव तसेच केंद्रप्रमुख संदीप तडवी यांच्या मार्गदर्शनानुसार आज जिल्ह्यातील सुमारे 2250 होमगार्डस् यांचे एचडीएफसी बँकेत खाते वर्ग करण्यात आले. भुषण कुमार उपाध्याय महासमादेशक यांच्याकडे संबंध महाराष्ट्र होमगार्ड संघटनाची मागणी होती की, होमगार्डस् यांना अपघात विमा त्याचप्रमाणे मेडिकल विमा होमगार्डस् यांचे मुलांना एज्युकेशन लोन असे अनेक बँकेचेच्या सोयी सुविधा शासन दरबारी मागणी मंजूर झाल्याबद्दल होमगार्डस् संघटनेमध्ये आनंदाचे वातावरण आहे. यावेळी प्र.तालुका समादेशक ईश्वर महाजन व क्लर्क जानकीराम पाटील तसेच अशोक देशमुख, स्वप्निल जैन, प्रताप वराळे, अरुण सातपुते व तालुक्यातील होमगार्डस् उपस्थित होते