TheClearNews.Com
Thursday, October 1, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

झुमकराम वाचनालय, व्यापारी संकुल बांधकाम : संत सावता माळी शिक्षण संस्थेला न्याय मिळणार का?

The Clear News Desk by The Clear News Desk
June 22, 2021
in कोर्ट, धरणगाव, शिक्षण, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) शहरातील मध्यवर्ती भागातील झुमकराम सार्वजनिक वाचनालयाच्या जागेतील दोन गट संत सावता माळी शिक्षण संस्थेसाठी आरक्षित होते. अगदी जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीने संबंधित जागा भाडेतत्वावर जागा देण्याचा ठरावही पालिकेत मंजूर झाला होता. त्यामुळे पालिका प्रशासनाने व्यापारी संकुलातील एक संपूर्ण मजला शाळेसाठी राखीव करावा. अन्यथा शाळेला पर्यायी जागा द्यावी, अशी मागणी संस्थेची आहे. परंतु ही मागणी फेटाळून लावत पालिका प्रशासनाने बांधकामाला सरळ स्टे मिळू नये म्हणून आधीच न्यायालयात कॅव्हेट करून ठेवली. तसेच जलदगतीने काम करून बांधकाम आता पूर्णत्वाच्या मार्गावरही पोहचवले आहे. त्यामुळे आता शिक्षण संस्थेला न्याय मिळेल की, पुन्हा एक जागा गिळंकृत करण्यात काही जण यशस्वी होतील?, याकडेच सुज्ञ नागरिकांचे लक्ष लागून आहे. तर दुसरीकडे पालिकेतील विरोधी पक्ष शांत बसून असल्यामुळे देखील आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

 

READ ALSO

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 01 ऑक्टोबर 2026 !

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 30 सप्टेंबर 2026 !

शहरातील मध्यवर्ती भागात सुरु असलेले झुमकराम सार्वजनिक वाचनालय आणि व्यापारी संकुलनातील दोन गट संत सावता माळी शिक्षण संस्थेसाठी आरक्षित होते. परंतू २००५ डीपी रीवाईज झाल्यानंतर हे आरक्षण संपुष्टात आल्याचे पालिका प्रशासनाचे म्हणणे आहे. तर दुसरीकडे झुमकराम सार्वजनिक वाचनालय आणि व्यापारी संकुलनाचे बांधकाम सुरु असलेल्या दोन गटांवर संत सावता माळी शिक्षण संस्थेसाठी आरक्षण होते. त्यामुळे सन २०१२-१३ मध्ये जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी घेऊन शिक्षण संस्थेला जागा भाडेतत्वावर देण्याबाबत ठराव तत्कालीन नगराध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन यांनी केला होता.

 

दुसरीकडे अॅड.शरद माळी यांनी झुमकराम वाचनालयाच्या बांधकामासंदर्भात माहिती अधिकारात माहिती मागितली होती. त्यात प्रामुख्याने पालिकेच्या ठरावाची प्रत. तसेच जागेचा सिटीसीएस उतारा, संपूर्ण आलेल्या निविदा सहित इस्टीमेटच्या प्रति, नगररचना विभागाची मंजुरी प्रत, आरसीसी ड्रॉईंग प्रत तसेच ज्या व्यक्तीला निविदा दिली आहे, त्या व्यक्तीचे संपूर्ण कायदेशीर जीएसटी आणि आयकर परताव्याची माहिती. त्याच बरोबर वेळोवेळी मटेरियल टेस्टिंग होत असल्याचा अहवाल, भूकंप प्रतिरोधक ड्रॉईंग, वाचनालय आणि शॉपिंग कॉप्लेक्स एकत्र बांधण्याचा संबंध काय? बाबत माहिती. गावाच्या लोकसंख्येनुसार क नगरपालिकेच्या वाचनालयाचे क्षेत्रफळ आवश्यकतेनुसार कमी अथवा जास्त असल्याबाबतची माहिती, सदरची जागा वाचनालयासाठी आरक्षित असल्याची माहिती, ठेकेदारास दिलेले आदेश याची माहिती अॅड.माळी यांनी माहिती अधिकारात मागवली होती. परंतू यातील फक्त काही मुद्द्यांची माहिती देण्यात आली तर इतर मुद्द्यांची माहिती देण्यात आलेली नाही. त्यामुळे पालिका प्रशासन मुद्दाम काही माहिती लपवू इच्छित आहे का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

 

दरम्यान, भेदरलेल्या पालिका प्रशानासाने झुमकराम वाचनालय व व्यापारी संकुल बांधकामासंदर्भात न्यायालयात कॅव्हेट दाखल करून ठेवली आहे. त्यामुळे बांधकामावर स्टे देण्यापूर्वी आता न्यायालयाला पालिका प्रशासनाची बाजू ऐकून घ्यावी लागणार आहे. परंतू पालिकेतील विरोधी पक्षच शांत बसून असल्यामुळे सुज्ञ नागरिक आश्चर्य व्यक्त करत आहेत. एका भरभराटीस येणाऱ्या शिक्षण संस्थेला न्याय देण्यासाठी कुणीही पुढे का येत नाहीय?, असा सवाल देखील विचारला जात आहे. तर शिक्षण संस्थेसाठी राखीव जागेवर व्यापारी संकुल उभारणीचा डाव गंभीर असून तालुक्यातील शैक्षणिक चळवळ धोक्यात आणण्याचा प्रयत्न असल्याची प्रतिक्रिया शिक्षणतज्ञ व्यक्त करत आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 01 ऑक्टोबर 2026 !

October 1, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 30 सप्टेंबर 2026 !

September 30, 2026
जळगाव

मतदार यादी पुनरीक्षणाबाबत राजकीय पक्षांसोबत बैठक

September 29, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 29 सप्टेंबर 2026 !

September 29, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 28 सप्टेंबर 2026 !

September 28, 2026
सामाजिक

Weekly Horoscope साप्ताहिक राशीभविष्य 27 सप्टेंबर ते 03 ऑक्टोंबर 2026 !

September 27, 2026
Next Post

डेल्टा प्लस कोविड विषाणूचे जिल्ह्यातील सर्व रुग्ण ठणठणीत !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धरणगावात तालुकास्तरीय फुटबॉल स्पर्धा उत्साहात !

November 18, 2022

विवाहप्रसंगी बर्तन बँकेचा वापर करणाऱ्या संजय महाजन यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार

May 29, 2025

संपूर्ण प्रकरणातून नाथाभाऊ बाहेर येतील, पक्षही त्यांच्या पाठीशी : नवाब मलिक

October 13, 2021

लोकसंघर्ष मोर्चातर्फे जागतिक आदिवासी दिवस उत्साहात साजरा

August 9, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group