धरणगाव (प्रतिनिधी) येथील बाजार समितीच्या निवडणुकीत महायुतीचे ‘सहकार’ पॅनल आणि महाविकास आघाडी प्रणीत ‘शेतकरी’ पॅनलमध्ये सरळ लढत होती. दरम्यान, पहिली मतमोजणी सुरु झाली असून हमाल-मापाडी संवर्गातून महायुतीच्या ‘सहकार’ पॅनलचे ज्ञानेश्वर वसंत माळी हे विजयाच्या समीप असल्याचे वृत्त आहे.
धरणगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या होत असेलेल्या निवडणुकीत महायुतीतील शिवसेना-भाजप-राष्ट्रवादी (संजय पवार गट) प्रणित सहकार पॅनलच्या वतीने पालकमंत्री गुलाबरावजी पाटील, आमदार चिमणराव पाटील, संजय पवार, पी. सी. आबा पाटील, सुभाष आण्णा पाटील यांच्या नेतृत्वात सहकार पॅनलने निवडणूक लढवली. दरम्यान, ज्ञानेश्वर वसंत माळी यांच्या विजयाची अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाहीय.