TheClearNews.Com
Sunday, August 9, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

ग्रामीण भागात थेट घरपोच सिलिंडरसाठी अतिरिक्त दर रद्द करण्याचे जिल्हाधिकार्‍यांचे आदेश

The Clear News Desk by The Clear News Desk
September 9, 2020
in जळगाव, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव प्रतिनिधी । पेट्रोलियम मंत्रालयाने वेळोवेळी ठरवून दिलेल्या रिटेल सेल प्राइजनुसारच घरपोच गॅस पुरवण्यासाठी दर आकारणे एजन्सीधारकांना बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे ग्रामीण भागात घरपोच गॅस सिलिंडरसाठी ठरवून देण्यात आलेले वाहतुकीचे दर जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी रद्द केले आहे. तसेच रिटेल सेल दरामध्ये घरपोच गॅस सिलिंडर देणे एजन्सीधारकांना बंधनकारक केले आहे. त्यापेक्षा जास्त दर घेणार्‍यांवर कारवाई करण्यात येईल तसेच शहरी भागात अनधिकृतपणे घेण्यात येणारे १० रुपये दर घेऊ नये अशी सूचनाही देण्यात आली आहे.

शहरी भागात देखील एजन्सी- धारकांकडून घरपोच सिलिंडर पोहचवितांन अतिरिक्त १० रुपये घेण्यात येत होते. ग्रामीण भागात किलोमीटरनुसार २३ ते ३५ रुपयांपर्यंत वाहतूक दर एजन्सीधारकांना ठरवून देण्यात आलेले होते. मात्र आता ते रद्द करण्यात आले. सप्टेंबर महिन्यासाठी पेट्रोलियम मंत्रालयाने घरपोच गॅस सिलिंडर पुरवण्यासाठी ६०० रुपये रिटेल सेल प्राइस ठरवून दिलेली आहे. त्यापेक्षा जास्त पैसे ग्राहकांना द्यावे लागणार नाही. आयओसीएल, बीपीसीएल व एचपीसीएल या तीनही पेट्रोलियम कंपनी अंतर्गत कार्यरत असलेल्या गॅस एजन्सीला वाहतुकीचे अतिरिक्त दर निश्चित करून देण्याची कार्यवाही ही फक्त डोंगराळ, पर्वतमय व लष्करी दृष्टिकोनातील भूप्रदेशासाठी लागू आहे.

READ ALSO

पाठवल्याची अश्लिल व्हिडीओ धमकी देत वृद्धाला ९ लाखांचा गंडा

वर्षानुवर्षांचा अंधार दूर; विठ्ठल मंदिर परिसर पुन्हा प्रकाशमय!

घरगुती वापराच्या १४.२ किलो वजनाच्या प्रति गॅस सिलिंडरसाठी संबंधित गॅस एजन्सीला ६१.८४ पैसे एवढे कमिशन मंजूर केलेले आहे. त्यात त्या संबंधित गॅस एजन्सीसाठी ३४.२४ पैसे आस्थापना खर्चासाठी व २७.६० पैसे एवढी रक्कम त्यांना वाहतुकीसाठी मंजूर केलेली आहे. तसेच ५ किलोग्रॅम वजनाच्या घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरसाठी संबंधित गॅस एजन्सीसाठी एकूण ३०.९२ पैसे एवढे कमिशन मंजूर केलेले असून, त्यात १७.१२ पैसे आस्थापना खर्चासाठी व १३.८० पैसे एवढी रक्कम वाहतुकीच्या खर्चासाठी मंजूर करण्यात आलेली आहे. त्यामुळे संबंधित गॅस वितरकांनी पेट्रोलियम मंत्रालय व नैसर्गिक गॅस यांनी वेळोवेळी घोषित होणार्‍या रिटेल सेल प्राइस प्रमाणेच गॅस सिलिंडरची विक्री करणे बंधनकारक केले आहे.

ग्राहकांना करता येईल तक्रार
गॅस सिलेंडर घरपोच पुरवण्यासाठी वाहतुकीच्या दरवाढीचे जिल्हाधिकार्‍यांनी दिलेले आदेश रद्द केले आहे. एजन्सीधारक रिटेल सेल प्राइसपेक्षा जास्त पैसे मागत असल्यास बीपीसीएलच्या १८००२२४३४४, आयओसीएल १८००२३३३५५५ व एचपीसीएल १८००२३३३५५५ या कस्टमर केअर क्रमांकावर तक्रार करावी, असे भारत पेट्रोलियमचे जळगाव जिल्ह्याचे व्यवस्थापक स्वप्निल श्रीवास्तव यांनी सांगितले. कार्यक्षेत्राबाहेर १ ते १० किलोमीटरपर्यंत २२, १० ते २० किलोमीटरपर्यंत ३१ व २० किलोमीटरच्या पुढे ३५ रुपये दरवाढ करण्यात आलेली होती. ही दरवाढ रद्द करण्यात आलेली आहे.

सेल रिटेल प्राइस व्यतिरिक्त जादा दर घेतल्यास कारवाई
जिल्ह्यातील ग्रामीण भागातील कोणत्याही गॅस वितरकांनी पेट्रोलियम मंत्रालयाकडून वेळोवेळी घोषित होणार्‍या सेल रिटेल प्राइसप्रमाणे गॅस सिलिंडरची विक्री करणे बंधनकारक आहे. कोणत्याही गॅस वितरकांनी त्यांना ठरवून दिलेल्या किमान आधारभूत किमतीपेक्षा जास्त दराने गॅस सिलिंडरची विक्री केल्याचे आढळून आल्यास त्यांच्याविरुद्ध जीवनावश्यक कायद्यातील तरतुदींच्या अनुषंगाने कारवाई करण्यात येईल, असे आदेश जिल्हाधिकार्‍यांनी दिले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

पाठवल्याची अश्लिल व्हिडीओ धमकी देत वृद्धाला ९ लाखांचा गंडा

August 9, 2026
धरणगाव

वर्षानुवर्षांचा अंधार दूर; विठ्ठल मंदिर परिसर पुन्हा प्रकाशमय!

August 8, 2026
गुन्हे

डॉक्टराचे कुलूपबंद घर भरदिवसा फोडले

August 8, 2026
गुन्हे

दहावीच्या विद्यार्थ्यावर शाळेतील मुलाकडूनच चॉपरने हल्ला

August 8, 2026
गुन्हे

स्मार्ट मीटरमधून ऑटो डिस्कनेक्ट तरीही वीजचोरी; जळगाव शहरात तीन जणांवर गुन्हे दाखल

August 7, 2026
गुन्हे

शाळांच्या आवारात मिनी मोबाईलद्वारे प्रेमाच्या जाळ्यात ओढणाऱ्यांचा भंडाफोड

August 7, 2026
Next Post

लेखक ज्ञानेश मोरे यांच्या येसूबाईंच्या चरित्रावर आधारित कादंबरीचे प्रकाशन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

पी.आर.हायस्कूलमध्ये स्व.ज्योतीदेवी आणि मंगलादेवी फाऊंडेशन तर्फे गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप !

July 19, 2022

सत्य गणपती दर्शनासाठी पायी निघालेल्या दोघं भाविकांना ट्रॅक्टरने चिरडले !

November 2, 2023

महाराष्ट्राच्या हापूस, केसरीची चव चाखणार जो बायडेन ; पुणेकराने पाठवली आंब्याची पेटी

May 20, 2022

महाराष्ट्र राज्य परीट धोबी सेवा मंडळाची अमळनेरात बैठक संपन्न

October 5, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group