धरणगाव (प्रतिनिधी) धरणगाव नगरपरिषदतर्फे पर्यावरणपूरक शाडू मातीपासून गणेश मूर्ती बनविण्याची कार्यशाळा आयोजित करण्यात आलेली आहे. या कार्यशाळेत जास्तीतजास्त नागरिकांनी, विद्यार्थ्यांनी या कार्यशाळेत आपला सहभाग नोंदविण्याचे आवाहन प्रशासक तथा मुख्याधिकारी विकास नवाळे यांनी केले आहे.
पर्यावरणपूरक गणेशोत्सव उपक्रमात सहभागी होऊया पर्यावरण स्वच्छ व सुंदर बनविण्यास हातभार लावूया, हे घोषवाक्य घेत धरणगाव पालिका प्रशासनाने पर्यावरणपूरक शाडू मातीपासून गणेश मूर्ती बनविण्याची कार्यशाळा आयोजित केली आहे. सदरील कार्यशाळा पूर्णपणे मोफत असेल तसेच यासाठी लागणारी शाडू माती नगरपरिषद मार्फत पुरविली जाणार आहे.
दि. १५ सप्टेंबर रोजी नगरपरिषद कार्यालयात सकाळी ११ ते २ च्या दरम्यान ही कार्यशाळा होणार असून कार्यशाळेत येताना सोबत आणावयाच्या वस्तू – लाकडी पॅड, पाणी बॉटल, छोटी वाटी, पेन्सिल, पेपर, आणि एक रुमाल सोबत आणावा. तसेच जास्तीतजास्त नागरिकांनी, विद्यार्थ्यांनी या कार्यशाळेत आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहन प्रशासक तथा मुख्याधिकारी विकास नवाळे यांनी केले आहे. तर अधिक माहितीसाठी निलेश वाणी (९६३७४२६३७४), महेश चौधरी (८०८०८१०९३३), यांच्यासोबत संपर्क साधावा, असेही पालिका प्रशासनाने कळविले आहे.