धरणगाव (प्रतिनिधी) शहरासह परिसरातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेले मरीमातेच्या आरतीचा मान आज धरणगावचे पोलीस निरीक्षक पवन देसले यांना मिळाला.
श्रावण महिन्याच्या यात्रेनिमित्त मरीमातेच्या आज दुसऱ्या मंगळवारी मरीआईच्या आरतीचा मान धरणगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक पवन देसले यांना मिळाला. आज सकाळी देसले साहेबांच्या हस्ते आरती करण्यात आली. यावेळी पो.नि. देसले यांचा मंडळाचे अध्यक्ष व संचालक मंडळाच्या वतीने शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.