धरणगाव (प्रतिनिधी) धरणगाव पोलिसांनी अवैध दारू विक्रेत्यांविरुद्ध आजही ‘वॉश आऊट’ मोहीम सुरूच ठेवली आहे. आज पहाटे नांदेड आणि निंभोरा शिवारात दोन ठिकाणी अवैध गावठी भट्टीवर धाड टाकत पोलिसांनी साधारण गावठी दारू आणि रसायन नष्ट केले आहे. विशेष दोन दिवसांपूर्वी देखील धरणगाव पोलिसांनी अशाच पद्धतीची कारवाई केली होती.
मागील काही दिवसापासून धरणगाव पोलिसांनी अवैध गावठी दारू विरुद्ध धडाकेबाज कारवाई सुरूच ठेवली आहे. दोन दिवसांपूर्वी निंभोरा, नांदेड येथे गावठी दारूसाठी लागणार तब्बल चाळीस हजाराचे रसायन पोलिसांनी नष्ट केले होते. आज देखील नांदेडला १ आणि निंभोरा येथे ३ अशा चार ठिकाणी कारवाई करण्यात आली आहे. यावेळी २४ हजार रुपये किंमतीचे १२०० लिटर दारू आणि रसायन नष्ट करण्यात आले. पोलिसांच्या कारवाईमुळे अवैध दारू विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहे.