धरणगाव (प्रतिनिधी) धरणगाव शिवसेना तालुका प्रमुखपदी डी.ओ. पाटील यांची नुकतीच निवड जाहीर करण्यात आली आहे.
पालकमंत्री गुलाबरावजी पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख निलेश पाटील, धरणगाव शिवसेना माजी तालुका प्रमुख गजानन नाना पाटील, विधानसभा क्षेत्र प्रमुख संजय पाटील, मोतीआप्पा पाटील या सर्वांच्या सहमतीने धरणगाव शिवसेना तालुका प्रमुखपदी देविदास ओंकार पाटील उर्फ डी.ओ. पाटील यांची निवड झाली आहे. यानिवडीबद्दल पालकमंत्री गुलाबराव पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील तसेच तालुक्यातील सर्व पदाधिकारी यांनी भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.