धरणगाव (प्रतिनिधी) शहरालगत असलेल्या तालुका क्रीडा संकुलाला अज्ञातांकडून छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल असे नामकरण केल्याचा प्रकार आज सकाळी उघडकीस आला आहे. दरम्यान, प्रशासकीय बाब वगळता या नामकरणाचे सर्वसामान्य धरणगावकारांकडून स्वागत केले जात आहे.
तालुका क्रीडा संकुलाला अज्ञात इसमांनी होर्डिंग लावून छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल असे नामकरण केले आहे. प्रशानासात काही वेळाकरिता या प्रकरानंतर खळबळ उडाली होती. परंतू सर्वसामान्य धरणगावकारांकडून या नामकरणाचे स्वागत करण्यात आल्यामुळे वातावरण खराब झाले नाही. तालुका क्रीडा संकुलावर छत्रपती शिवाजी महाराज क्रिडा संकुलन असे होर्डिंग लावण्यात आले आहे. गेल्या वर्षापासून धरणगाव तालुका क्रीडा संकुलन धूळखात पडून होते. मात्र त्याठिकाणी आता लोकवर्गणीतून साफसफाई स्वच्छता करण्यात सुरु आहे. दरम्यान, क्रीडा संकुलाचे काम पूर्णत्वास न्यावे आणि अधिकृतरित्या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल असे नामकरण करण्यात यावे, अशी मागणी होत आहे.
धरणगाव शहरातील शिवप्रेमींनी सात वर्षापूर्वी माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांच्याकडे छत्रपती शिवाजी महाराज असे नाव क्रीडा संकुलनाला देण्यात यावे, अशी मागणी केली होती. आज पालकमंत्री गुलाबराव पाटील असल्यामुळे ते निच्चीतच क्रीडा संकुलनाला छत्रपती शिवाजी महाराज नाव देतील, अशी आशा करतो व अज्ञात होर्डिंग लावणाऱ्याचे हार्दिक अभिनंदन करतो.
चंदन पाटील (जळगाव ग्रामीण तालुका अध्यक्ष युवक काँग्रेस)
क्रीडा संकुलाचे बांधकाम चालू असताना तहसीलदार साहेब व तत्कालीन पालकमंत्री गुलाबराव देवकर यांना आम्ही शिवप्रेमींनी निवेदन दिले होते की, धरणगाव येथील क्रीडा संकुलनला छत्रपती शिवाजी महाराज असे नाव देण्यात यावे. हीच मागणी आम्ही जिल्हाधिकारी, धरणगाव तहसील कार्यालयाकडे देखील केली होती. बऱ्याच दिवसापासून क्रीडा संकुलला छत्रपती शिवाजी महाराज नामकरण होईल, अशी आशा वाटत होती. होर्डिंग कोणी लावले माहित नाही, परंतू त्यांचे अभिनंदन !
गुलाब मराठे (सामाजिक कार्यकर्ते)