धरणगाव (प्रतिनिधी) धरणगाव तालुका दिव्यांग महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली ना. गुलाबराव पाटील यांची नुकतीच सदिच्छा भेट घेतली. यावेळी दिव्यांग महासंघाचे संस्थापक अध्यक्ष माजी नगराध्यक्ष पी.एम पाटील सर तसेच तालुक्यातील सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी ना. गुलाबराव पाटील यांच्यासोबत दिव्यांग बांधवांच्या विविध समस्यांबाबत चर्चा करण्यात आली. 12 सप्टेंबर रोजी धरणगाव येथे दिव्यांगांच्या तालुका मेळावा व अंतोदय योजने अंतर्गत कार्ड वाटप तसेच मार्गदर्शन शिबिर आयोजनाबाबत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याशी चर्चा करण्यात आली. या प्रसंगी पी.एम.पाटील सर, तालुका प्रमुख संजय पाटील,रवींद्र काबरा,संजय पाटील सर,हेमंत चौधरी व तालुक्यातील पदाधिकारी तसेच दिव्यांग बांधव उपस्थित होते.