धरणगाव (प्रतिनिधी) शहरातील एका तरुणाची ३ लाखांत ऑनलाईन फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी धरणगाव पोलिसात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संदर्भात अधिक असे की, मुर्तजा अहमद शेख इसहाक (वय ३०) हे शहरातील रा. मराठे गल्लीत वास्तव्यास आहेत. मुर्तजा यांच्या मोबाईलवर टेलिग्राम अँप आहे. १९ ऑगस्ट ते दि. १० सप्टेंबर २०२२ च्या दरम्यान, त्यावर प्रिया नावाची आय. डी. क्र. @Priya७१८७ वरुन मुर्तजा यांना app.tour.rating.com व thomascook .in यावर पैसे गुंतविण्याचे सांगून त्या बदल्यात कमिशन मिळेल, असे आमिष दिले. या अमिषाला बळी पडून मुर्तजा यांनी अमेझॉन पे (amazon pay) व पे टिएम (paytm) अकाउंट वरून SAYYAD ANIS ALI, IFSC [u] FDRL ०००५५५५, Bank name u FEDERAL BANK, A/c no. paytmqr२८१००५०५०१०११k३pd२jmnpq२@pa ५५५५०१०६९३७७२३ यावर व paytm paytmqr२८१००५०५०१०११३pd२jmnpx२@paytm. arunch११८२२@ybl, qlpaymm3@shitalonjaz६८१@axl, talonjaz६८१@ibl या आयडीवर वेळोवेळी एकूण ३ लाख १० हजार ८६४ रुपये पैसे पाठवले. परंतू पैसे स्वीकारून देखील मुर्तजा यांना कोणत्याही प्रकारचे कमिशन दिले नाही. यामुळे त्यांनी ९९२१७९९४८८ या कस्टमर केयर मोबाईल नंबरवर फोन करून पैशांची मागणी केली. परंतू याठिकाणी देखील त्यांना प्रतिसाद मिळाला नाही. यामुळे आपली फसवणूक झाल्याची खात्री होताच मुर्तजा यांनी धरणगाव पोलिसात धाव घेत टेलिग्राम अँप वरील @Priya७१८७ या अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पो.नि. राहुल खताळ हे करीत आहेत.