नवी मुंबई (वृत्तसंस्था) मद्यधुंद अवस्थेत भररस्त्यात धिंगाणा घालत असलेल्या एका तरुणीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओत एक तरुणी मद्यपान केलेल्या अवस्थेत भररस्त्यात धिंगाणा घालताना दिसून येत आहे. इतकंच नाही तर, या तरुणीने पोलिसांसोबतही हुज्जत घालत कॉलर सुद्धा पकडली. माहितीनुसार हा प्रकार सानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला आहे.
मद्यधुंद अवस्थेत असलेली ही तरुणी एका बारच्या बाहेर धिंगाणा घालतांना व्हिडिओत दिसत आहे. दारूच्या नशेत टुल्ल झालेल्या या तरुणीला आपण काय करतोय याचे देखील भान राहिलेलं नाही. तरुणीसोबत असलेली दुसरी तरुणी तिला आवरण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र तरी देखील ही तरुणी काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत दिसत नाहीये. हा व्हिडिओ नेमका कधीचा आहे याची माहिती अद्यापही समोर आली नाही. मात्र, हा सर्व प्रकार नवी मुंबईतील सानपाडा परिसरात घडल्याचं सांगितलं जातंय.
व्हायरल झालेल्या या व्हिडिओत तरुणी शिवीगाळ करताना दिसत आहे. त्याचवेळी ती रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांना देखील अडवण्याचा प्रयत्न करत आहे. इतकंच नाही तर, ती भररस्त्यात लोटांगण घेत असल्याचंही व्हिडिओत दिसत आहे. मद्यधुंद अवस्थेत असलेल्या या तरुणीला बघण्यासाठी परिसरात मोठी गर्दी झाल्याचं दिसून येत आहे. तरुणीला समजवण्यासाठी गेलेल्या पोलिसांना सुद्धा ती शिवीगाळ करत असल्याचं व्हिडिओतून समोर आलं आहे. एका पोलीस कॉंस्टेबलची कॉलर सुद्धा या तरुणीने पकडली आहे. दरम्यान, हा सर्व प्रकार समोर येताच पोलिसांनी या तरुणीवर गुन्हा दाखल केल्याची माहिती आहे.
















