धरणगाव(प्रतिनिधी) : शतकोत्तर पी.आर.हायस्कूलमध्ये आज विद्यार्थ्यांच्या लेझिम आणि ढोल ताशांच्या गजरात श्रींची प्रतिष्ठापना करण्यात आली. श्री गणेशाच्या स्वागत मिरवणुकीत शाळेच्या मुलांच्या ढोल पथकाने आणि मुलींच्या लेझिम पथकाने तालबद्ध आणि लयबद्ध खेळ नृत्य दाखवून धरणगावकरांची मनं जिंकली.
क्रीडा शिक्षक श्री.मनोज परदेशी यांच्या सुंदर नियोजनाचा विलक्षण अनुभव धरणगावकरांनी घेतला.विशेष म्हणजे मिरवणुकीचा केंद्रबिंदू शाळेचे विद्यार्थी होते. या विद्यार्थ्यांना श्री.नवनीत सपकाळे,श्री.वाय.ए.पाटील,श्री.डी.एच.कोळी यांचे मार्गदर्शन मिळाले.संस्थेचे अध्यक्ष डॉ.अरूण कुलकर्णी, सचिव डॉ.मिलिंद डहाळे, संचालक अजय पगारीया, मुख्याध्यापक डॉ.संजीवकुमार सोनवणे, उपमुख्याध्यापक डॉ.आशा शिरसाठ, पर्यवेक्षक कैलास वाघ,यू.एस.बोरसे,बी.डी.शिरसाठ,डी.एस.पाटील यांनी या विद्यार्थ्यांचे कौतुक केले.कला शिक्षक पी.डी.महाजन आणि सौ.सुषमा महाजन यांच्या हस्ते विधिवत पूजा करून श्रींची प्रतिष्ठापना करण्यात आली.