धुळे (प्रतिनिधी) तालुक्यातील सावळदे फाट्याजवळ छत्रपती संभाजीनगर येथून उज्जैन जाणाऱ्या मध्यप्रदेश राज्य परिवहनच्या धावत्या बसमधून पडल्याने बसमधील मदतनीस ठार झाला. याप्रकरणी मोहाडी नगर पोलीस ठाण्यात बस चालकाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मध्यप्रदेश राज्य परिवहनची बस (एमएपी १३ / एएच-३३३३) दि. २९ रोजी छत्रपती संभाजी नगर येथून उज्जैन जाण्यासाठी निघाली. चालक निर्भयसिंग रामसिंग राठोड हा ओव्हरटेक करीत असतांना बसमध्ये दरवाजाजवळ बसलेला मदतनीस गोपाल बाबुलाल शर्मा (५२) रा. उज्जैन, हा बसमधून बाहेर फेकला गेला.
वाहनाच्या मागील चाकात सापडल्याने गंभीर जखमी होवून जागीच ठार झाला. याप्रकरणी वाहक सिध्दुलाल शिवालाल मालवी (५६) यांनी मोहाडी नगर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन चालक निर्भयसिंगविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.