जळगाव (प्रतिनिधी) धुळे जिल्हा परिषद पोटनिवडणुकीत शिरपूर तालुक्यात अमरीश पटेल यांनी पुन्हा एकदा आपली जादूची कांडी फिरवत वर्चस्व कायम राखले आहे. या गटात आठही जागा भाजपकडे गेल्या आहेत.
आमदार अमरीश पटेल हे पूर्वी काँगेस पक्षात होते. त्या वेळी शिरपूर जिल्हा परिषद गटात काँग्रेस चे वर्चस्व होते. आता ते भाजपमध्ये गेले आहेत. त्यांनी आपला दबदबा कायम राखला आहे. या गटातील आठही जागा त्यांनी भाजपकडे राखल्या आहेत. विशेष म्हणजे या गटात एक जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडे होती तीही त्यांनी भाजपकडे खेचून घेतली आहे. या गटात एकूण आठ जागा आहेत. या पूर्वी दोन जागा बिनविरोध भाजपच्या निवडून आल्या आहेत. शिरपूर गटातील निकालामुळे आता धुळे जिल्हा परिषदेतही आमदार अमरिश पटेल यानी आपले वर्चसव कायम ठेवत भाजपकडे सत्ता राखण्यात यश मिळविले आहे.
शिरपूर निकाल
अर्थे गण : संगीता शशिकांत पाटील (भाजप)
तऱ्हाडी गण : प्रतिभा कैलास भामरे (भाजप)
वनावल गण : ममता ईश्वर चौधरी (भाजप)
जातोडा गण :विठाबाई निंबा पाटील (भाजप)
शिंगावे गण (पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस) विजयी चंद्रकांत दामोदर पाटील (भाजप)
अजनाड गण : रेखाबाई दर्यावसिंग जाधव (भाजप)
विखरण गण : विनिता मोहन पाटील (बिनविरोध, भाजप)
करवंद गण : यतीश सुनिल सोनवणे (बिनविरोध, भाजप)