जळगाव (प्रतिनिधी) श्री सदगुरू दादाजी धुनिवाले महाराज (खंडवा) यांची पुण्यतिथी साजरी करण्यात येते. दि.२४ डिसेंबर रविवारी दादाजी दरबार खेडी येथे पुण्यतीथी उत्सव होणार आहे.
दि.१६ डिसेंबर पासून खेडी दरबार येथे विजय ग्रंथ पारायण सुरूवात करण्यात आली.दि.२३ रोजी अखंड नामधून होणार आहे. तसेच भंडारा रात्री ७ वाजता सुरू होईल. दिवसभर दरबारात होमहवन कार्यक्रम होणार आहग. याच ठिकाणी रात्री ९ वाजता भजनांचा कार्यक्रम होणार आहे. भाविकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री केशवानंद धुनिवाले दादाजी सेवा मंडळ संचालित दादाजी दरबारच्या आयोजकांनी केले आहे.