TheClearNews.Com
Friday, October 16, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जळगावात दिवसा पाच तास राहणार अवजड वाहनांना प्रवेश

vijay waghmare by vijay waghmare
April 2, 2025
in जळगाव, जिल्हा प्रशासन
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) शहरातून दिवसभर होणारी अवजड वाहनांची वाहतूक डोकेदुखी ठरत आहे. या अवजड वाहनांना प्रवेशाविषयी काढण्यात आलेल्या अधिसूचनेवर हरकती मागविण्यात आल्या होत्या. त्यानंतर सकाळी ११ वाजेपर्यंत अवजड वाहनांना बंदी राहणार आहे. तसेच प्रस्ताविक वेळेत बदल करुन सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेपर्यंत शहरातून अवजड वाहनांना प्रवेश राहणार आहे.

शहरातील काही मार्गावर वाहतूक व्यवस्थेविषयी नियमावली ठरवून दिलेली आहे. तसेच अवजड वाहनांना प्रवेशासंदर्भातही वेळ ठरवून देण्यात आली आहे. गेल्या आठ वर्षांपूर्वी काढलेल्या अद्यादेशानुसार बाजारपेठेत मालाची वाहतुक करणाऱ्या वाहनांना सकाळी ११ ते दुपारी ४ व रात्री १० ते सकाळी ६ या वेळेत परवानगी देण्यात आली होती. मात्र दिवसेंदिवस वाढती वाहनांची संख्या, रहदारी तसेच शाळा परिसर, शासकीय कार्यालय, रेल्वे स्थानक, मुख्य बाजारपेठ, सरकारी व खासगी रुग्णालय, बँका, मोठ्या प्रमाणात नागरी वस्ती यांचा विचार करून वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यासंदर्भात नवीन अधिसूचना काढली होती व त्यावर हरकती मागविल्या होत्या.

READ ALSO

महावितरणच्या ‘सेवा सेतू’ व ‘सेवा संकल्प अभियानाला प्रतिसाद

प्रगतिशील महाराष्ट्र-‘२०२६ प्रदर्शनात महावितरणच्या स्टॉलचा गौरव

शाळा, व्यापाऱ्यांच्या हरकतीनंतर वेळेत बदल
अधिसूचनेत मालवाहू वाहनांसाठी अजिंठा चौक ते नेरी नाका, टॉवर चौक, शिवाजीनगर उड्डाणपूल यामार्गावर सकाळी ९ ते दुपारी ३ तसेच रात्री ९ ते सकाळी ६ या वेळेतच मालवाहू वाहनांना प्रवेश दिला जाणार असल्याचे नमूद होते. सकाळची प्रस्तावित वेळ बदल करीत अवजड वाहनांसाठी सकाळी दोन तास कमी करून ९ ऐवजी ११ वाजेपासून प्रवेश राहणार आहे.

आठ वर्षांपुवीच्या अधिसूचनेची अंमलबजावणी
मात्र नंतर दुपारी प्रस्तावित ३ वाजेऐवजी ४ वाजेपर्यंत अवजड वाहनांना प्रवेश दिला जाणार आहे. तसेच रात्रीच्या प्रस्तावित ९ ते सकाळी ६ या वेळेत कोणताही बदल न करता ती वेळ कायम ठेवली आहे. मात्र आठ वर्षांपूर्वीच्या अधिसूचनेतील रात्री १० वाजेपासून असलेली परवानगी आता ९ वाजेपासून मिळाली आहे.

वर्दळीमुळे सकाळी ११ पर्यंत बंदी कायम
अधिसूचनेत सकाळी ९ ते दुपारी ३ अशी वेळ प्रस्ताविक केली होती. मात्र सकाळी अनेक शाळा, महाविद्यालय, बँका व इतर कार्यालयात येणाऱ्या जाणाऱ्यांची १० वाजेनंतरही वर्दळ असते, असे काही मुद्दे हरकतींच्या माध्यमातून मांडण्यात आले. त्यामुळे सकाळी ११ वाजेपर्यंत अवजड वाहनांना बंदी कायम ठेवली आहे.

व्यापाऱ्यांना १ तास दिला वाढवून
सकाळची वेळ कमी केल्याने व दुपारी एक वाजेपासून एक ते दोन तास बाजारपेठेत जेवणाची वेळ असल्याने ११ ते दुपारी ३ एवढ्‌या कमी वेळेत मालाची वाहतुक करणे शक्य होणार नसल्याचे व्यापाऱ्यांनी हरकतीद्वारे सांगितले. त्यामुळे दुपारी ३ ऐवजी ४ वाजेपर्यंत अवजड वाहनांना एक तास वाढवून देण्यात आला. यासाठी हरकतींचा विचार करीत सुधारीत अधिसूचना काढण्यात आली.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जिल्हा प्रशासन

महावितरणच्या ‘सेवा सेतू’ व ‘सेवा संकल्प अभियानाला प्रतिसाद

October 15, 2026
जळगाव

प्रगतिशील महाराष्ट्र-‘२०२६ प्रदर्शनात महावितरणच्या स्टॉलचा गौरव

October 11, 2026
जळगाव

पातरखेडे येथे दुष्काळसदृश परिस्थितीची महसूलमंत्र्यांकडून पाहणी; पंचनामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश

October 5, 2026
जळगाव

दुष्काळी परिस्थितीमुळे महावितरणच्या कर्मचाऱ्यांना मुख्यालय सोडण्यास सक्त मनाई

October 1, 2026
जळगाव

संवेदनशील पर‍िस्थितीत वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी दक्ष राहा

September 29, 2026
जळगाव

‍विवेकानंद विद्यालयात महावितरण तर्फे जागृती

September 20, 2026
Next Post

जन्म दाखल्यांची पडताळणी ; दोषींवर होणार गुन्हे दाखल !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

घराचं प्लास्टर करत असताना घडली दुर्घटना ; युवकाचा दुर्दैवी मृत्यू !

September 1, 2023

विद्यापीठ व एसीटीचा विद्यार्थी हितासाठी आदर्श उपक्रम : डॉ.बाळू पी.कापडणीस

July 19, 2021

नांदूरा तालुक्यात शिक्षक उपलब्ध न झाल्यास मनसे स्वखर्चातून शिक्षक उपलब्ध करून देणार !

December 21, 2022

रावेर तालुक्यातील एचआयव्ही बाधित महिलेवर मोतीबिंदूची यशस्वी शस्त्रक्रिया

April 19, 2026
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group