जळगाव (प्रतिनिधी) कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील परीक्षा विभागातील रक्कमेचे विद्यापीठाने केले काय ? याचे जाहीर प्रकटन विद्यापीठ प्रशासानाने करावे, अशी मागणी विद्यापीठ प्रशासनाला एका निवेदनाद्वारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सचिव अँड. कुणाल पवार यांनी केली आहे.
विद्यापीठ प्रशासनाची आर्थिक उलाढाल मोठ्या प्रमाणावर आहे. जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्ह्यांमध्ये कोरोना प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढताना दिसत आहे. अनेक लोकांचे या आजारामुळे निधन होताना दिसतेय. परंतु विद्यापीठाने कोविड परिस्थितीमध्ये मदतीचा हात दिला नाही. अशी खंत वाटते. विद्यापीठाचा पैसा जातो कुठे ? कोणाच्या घरात पाणी मुरतंय ?, तसेच एप्रिल २०२० व फेब्रुवारी मार्च २०२१ या कोरोना विषाणु च्या प्रादुर्भावाच्य काळात ऑनलाइन परीक्षा घेतली गेली. प्राध्यापकांकडून प्रश्नसंच काढून घेतले त्याचे मानधन विद्यापीठ देणार होते ते का दिले गेले नाही. विद्यापीठात १५०० पेपर शिकवले जातात. २०१४ च्या पत्राप्रमाणे १५०० पेपर गृहित धरले तरी २२ कोटी ५ लाख रुपये होतात. एप्रिल २०२० व फेब्रुवारी मार्च २०२१ या दोन वर्षाचे मिळून ४ कोटी ५ लाख रुपये ही रक्कम अहेशिबी आहे. ही रक्कम अजुन प्राध्यपकांना दिली गेली नाही. या रक्कमेचे विद्यापीठाने केले तरी काय ? याचा जाहीर प्रकटन विद्यापीठ प्रशासानाने करावे, अशी मागणी विद्यापीठ प्रशासनाला निवेदनाद्वारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सचिव अँड. कुणाल पवार, राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसचे प्रदेश सचिव भूषण संजय भदाणे यांनी केली आहे.