धरणगाव (प्रतिनिधी) शहरातील पुर्वत्तर भागात तेली तलाव असून तेथे हजारो लोकांचे श्रद्धास्थान म्हणून सिध्दी हनुमान मंदीर व ग्रामदैवत मरीआईचे मंदीर आहे. तेथे दररोज शेकोडो भाविक मोठ्या श्रध्देने व भावनेने दर्शनाला जातात. परंतु बाजूस असलेल्ये तेली तलावात घाणीचे मोठे साम्राज्य पसरलेले असून सर्वत्र दुर्गधीमुळे भाविकांसह नागरीकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
तेली तलावातील घाणीमुळे पालिका प्रशाससंदर्भात चिड व्यक्त होत आहे. प्रशासनाने त्वरीत लक्ष घालून तलावाची साफसफाई करावी अशी मागणी होत आहे. मागील काही दिवसांपूवी परिसरातील काही नागरिकांनी सफाईची मागणी केली होती. परंतु प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी यांनी उडवाउडवीचे उत्तरे देऊन दुर्लक्ष केले. परंतु धरणगावकरांचे श्रद्धास्थान असलेल्या ह्या दोघं मंदिरातील भाविकांना तलावातील घाणीचा दुर्गंधीमुळे प्रचंड त्रास होत आहे. त्यामुळे आता नागरीक आंदोलनच्या तयारीत आहे. तरी पालीका प्रशासनाने तलावातील कचरा आणि शेवाळ काढुन परिसरातील असंख्य नागरीकांना सहकार्य करावे अशी मागणी होत आहे. दरम्यान, चिंतामण मोरया परीसारतील नागरिकांचे सांडपाणी नाल्याद्वारे तलावात येत असल्यामुळे तलावात घाण निर्माण झाली असून दुर्गंधी येत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.