मुंबई (वृत्तसंस्था) एकनाथ शिंदे मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले. मात्र हा निर्णय भाजपा आमदारांना रुचलेला दिसत नाही. याच मुद्द्यावर आज भाजपाच्या सर्व आमदारांची ताज हॉटेलमध्ये बैठक होणार आहे.
राज्यातल्या राजकारणातील घडामोडींनंतर अखेर काल संध्याकाळी राज्यात नवं सरकार स्थापन झालं. शिवसेनेतून बंड करत वेगळे झालेले एकनाथ शिंदे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी एकत्र येत सरकार स्थापन केलं. परंतू देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री न झाल्याने भाजप आमदार नाराज झाले आहेत. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील अशी अपेक्षा होती मात्र तसे घडले नाही. तर भाजपच्या या आमदारांची समजूत काढण्यासाठी ही बैठक बोलावली आहे. आशिष शेलार, गिरीश महाजन, चंद्रकांत पाटील, बावनकुळे असे भाजपाचे ज्येष्ठ नेते या बैठकीला उपस्थित असतील.
















