कोल्हापूर (वृत्तसंस्था) दिशा सालियन (Disha Salian murder death) प्रकरणाचा उलगडा लवकरच होणार आहे. त्या संबंधित सर्व पुरावे तयार असल्याचे भाजप नेते चंद्रकांत पाटील (Bjp Chandrakant Patil) यांनी कोल्हापुरामध्ये सांगितले आहे.
सर्व पुरावे तयार आहेत. सात मार्च नंतर दिशा सालियन प्रकरणाचा उलगडा होईल. कोणाकोणाचा सहभाग आहे हे लवकरच स्पष्ट होईल असा मोठा गौप्यस्फोट भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. इतकंच नाही तर दिशा सालियन प्रकरणाचा उलगडा होऊ नये यासाठीच सर्व फडफड आणि शिवराळ भाषा सुरू असल्याचंही चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. कोल्हापुरात आयोजित पत्रकार परिषदेत चंद्रकांत पाटील यांनी हे वक्तव्य केलं आहे.
नितेश राणेंच्या ट्विटने खळबळ
भाजप आमदार नितेश राणे (BJP MLA Nitesh Rane) यांनी दिशा सालियन मृत्यू प्रकरणाच्या संबंधित ट्विट केलं आहे. नितेश राणे यांनी केलेल्या या ट्विटनंतर दिशा सालियन मृत्यू प्रकरण आणि मुंबई पोलीस दलातील निलंबित अधिकारी सचिन वाझे (Sachin Vaze) याचा काही संबंध आहे का? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
















