यावल (प्रतिनिधी) तालुक्यातील हिंगोणा या गावात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीची मिरवणूक सुरू होती. तेथे नाचायला कसे काय आले अशा बोलण्याच्या कारणावरून वाद झाला. आणि या वादातून एका ४४ वर्षीय महिलेला व तिच्या मुलाला आणि नातेवाईकाला १७ जणांनी शिवीगाळ करून मारहाण केली. आणि महिलेच्या मनाला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करीत तिचा विनयभंग केला. तसेच महिलेजवळील ११ हजार रुपये देखील या हाणामारीत गहाळ झाले. तेव्हा या प्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी ज्ञानदेव भालेराव, देवानंद तायडे, पवन बोदडे, अजय तिडके, विनोद तायडे, प्रशांत मोरे, रोहित गजरे, आकाश तिडके, निखिल गजरे, मोहित गजरे, प्रवीण महाले, मयूर तायडे, ऋषिकेश बोदडे, वसंत सोनवणे, जयंत बोदडे, प्रद्युन्य वराडे व कुंदन तायडे या १७जणांविरूध्द फैजपूर पोलीस ठाण्यात १७ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहायक पोलिस निरिक्षक रामेश्वर मोताळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नीरज बोकील करीत आहे.