पारोळा(प्रतिनिधी) : जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी पुढील आदेश होईपर्यंत गुरांचे बाजार भरवू नये, असे आदेश दिले असतानादेखील पारोळा येथे रविवारी आठवडे बाजार असल्याने शेकडोच्या संख्येने गुरांना विक्रीसाठी आणून शेतकऱ्यांनी गुरांचा बाजार भरवला.
बाजार समितीने गुरांचा बाजार भरवण्यास मज्जाव केल्याने हा बाजार पारोळा शहराच्या बाहेरून जाणारा नवीन बायपास, अमळनेर रोडलगत भरवण्यात आला होता. या बाजारात शेकडो लहान पिकअप व्हॅन व छोटा हत्ती या वाहनाने जनावरे घेऊन शेकडो शेतकरी आले होते.
अतिवृष्टीत हातचे गेलेले कडधान्य, शेतात असलेल्या पिकांसाठी हातातोंडाशी आलेला घास वाचवण्यासाठी, पिकांना लागणारी मजुरी, फवारणीसाठी पैसा या अडचणी दूर करण्यासाठी आणि जनावरांना यात सातशे ते आठशे जनावरे आलेले नैसर्गिक लम्पी रोगाचे सावट, विक्रीला आणले होते. यात जास्त यामुळे शेतकरी हवालदिल झाला करून बैलांचा समावेश होता आहे
सकाळी सहा वाजेपासून प्रारंभ
हा बाजार कोणाच्या आदेशाने भरवण्यात आला त्याचा तपास केला असता शेतकऱ्यांनीच व विकत घेणाऱ्या बैल व्यापायांनी परस्पर हा बाजार भरवला असल्याचे समजले. सकाळीच लवकर सहा वाजेपासून हा बाजार भरवण्यात आला होता.