मुंबई (वृत्तसंस्था) अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी समीर वानखेडे हे मुस्लिम असल्याचा पुरावा म्हणून त्याच्या जन्माचा दाखला ट्विटरवरुन शेअर केले. यात आता आणखीन एक धक्कादायक खुलासा मालिकांनी केलाय. वानखेडे आणि ते दूरचे नातेवाईक असल्याचं काही लोकांनी माहिती दिली असून नात्यातील आमची एक बहीण आहे. त्यांची मुलगी ज्या घरात आहे. त्यांचं (वानखेडे कुटुंबाचं) त्या मुलीशी काहीतरी नातं असल्याचं मलिक यांनी म्हंटलय.
नवाब मलिक यांनी समीर वानखेडेंच्या पहिल्या लग्नातील रिसेप्शनचा एक फोटो ट्विट केला. २००६ साली विशेष विवाह कायदा १९५४ अंतर्गत नागरी विवाह समारंभात डॉ. शबाना कुरेशी यांच्याशी लग्न केले होते. २०१६ मध्ये विशेष विवाह कायद्याअंतर्गत समीर आणि शबाना या दोघांनी दिवाणी न्यायालयाद्वारे परस्पर घटस्फोट घेतला. २०१७ मध्ये समीर यांनी क्रांती रेडकरशी विवाह केला. याच पहिल्या विवाहचा फोटो नबाव मलिक यांनी पोस्ट करत पेहचान कौन अशी कॅप्शन दिली होती.
आमची एक बहीण आहे…
समीर वानखेडेंच्या पहिल्या पत्नीसंदर्भात नवाब मलिक यांनी या अधिकाऱ्याने अनेकदा खोटारडेपणा केल्याचा आरोप केलाय. यावेळी मलिक यांना तुमचं वानखेडे यांच्या पहिल्या पत्नीशी काही बोलणं झालं का असं विचारण्यात आलं असता त्यांनी वानखेडे आणि ते दूरचे नातेवाईक असल्याचं काही लोकांकडून कळल्याचं सांगितलं. “काही लोकांनी माहिती दिली लांबून काहीतरी नात्यातील आमची एक बहीण आहे. त्यांची मुलगी ज्या घरात आहे. त्यांचं (वानखेडे कुटुंबाचं) त्या मुलीशी काहीतरी नातं आहे,” असं मलिक यांनी म्हटलं आहे.
















