चाळीसगाव (प्रतिनिधी) : भारतीय जनता पक्षाच्यामार्फत राबविण्यात येणाऱ्या राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा अंतर्गत चाळीसगाव तालुक्याचे आमदार मंगेशदादा चव्हाण व भारतीय जनता पक्षाच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या दि.१७ सप्टेंबर या वाढदिवसाच्या शुभमुहूर्तावर चाळीसगाव शहर व तालुक्यात जन्माला आलेल्या २५ बालकांना प्रत्येकी १ ग्रॅम सोन्याच्या नाण्यांचे वाटप आज दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर करण्यात आले. मालेगाव रोड येथील शिवनेरी पार्क येथील नियोजित स्वामीनारायण मंदिर भूमिपूजन सोहळ्याच्या मंचावर मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला.
यावेळी आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्यासह भाजपा तालुकाध्यक्ष प्रा.सुनील निकम, शहराध्यक्ष घृष्णेश्वर पाटील, बजरंग दल तालुका प्रमुख अविनाश चौधरी, माजी मार्केट सभापती रविंद्र चुडामन पाटील, सरदारशेठ राजपूत, युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष कपिल पाटील, ओबीसी मोर्चा प्रदेश सरचिटणीस रमेश सोनवणे सर, नगरसेविका सौ. विजयाताई भिकन पवार, सौ.विजयाताई प्रकाश पवार, माजी नगरसेवक राजेंद्र गवळी, चिराग शेख, माजी पंचायत समिती सदस्य सुभाष पाटील, विधानसभा क्षेत्रप्रमुख अनिल नागरे, तालुका सरचिटणीस धनंजय मांडोळे, शहर सरचिटणीस अमोल नानकर, जितेंद्र वाघ, ओबीसी मोर्चा किशोर रणधीर, वैद्यकीय आघाडी तालुकाध्यक्ष डॉ.रविंद्र मराठे, बबनदादा पवार, राकेश बोरसे सर, महेश शिंदे,
शिवनेरी फाउंडेशनच्या अध्यक्षा सौ.प्रतिभाताई चव्हाण, योजनाताई पाटील व नवजात बालकांचे आई वडील, नातेवाईक उपस्थित होते.
यावेळी मनोगत व्यक्त करताना आमदार मंगेशदादा चव्हाण म्हणाले की, घरात नवीन सदस्याचे आगमन हा प्रत्येकाच्या जीवनातील महत्वाचा क्षण असतो मात्र ज्या पंतप्रधानांनी भारत हाच आपला परिवार मानून अहोरात्र मेहनत घेऊन भारताला बलशाली व सक्षम बनविण्याचा ध्यास घेतला आहे अश्या राष्ट्रनेत्याच्या वाढदिवसाच्या दिवशी बाळाचा जन्म होणे हेदेखील सुवर्णक्षणापेक्षा कमी नाही. म्हणून यादिवशी जन्माला येणाऱ्या बाळांना १ ग्रॅम सोन्याचे नाणे भेट देण्याचा निर्णय आम्ही घेतला. सोन्याचे नाणे हे केवळ प्रतिकात्मक असून त्यामागील प्रेम व जिव्हाळा महत्वाचा आहे. ज्याप्रमाणे पंतप्रधान मोदींजींनी बलशाली भारत बनविण्याच्या जो संकल्प घेतला आहे त्याला जर बळ द्यायचे असेल तर आपली भावी पिढी देखील त्याच विचारांची असली पाहिजे, नव्या पिढीपुढे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचा आदर्श डोळ्यापुढे ठेवावा असे प्रतिपादन यावेळी आमदार मंगेश चव्हाण यांनी केले.
भाजपा तालुकाध्यक्ष प्रा.सुनील निकम व सरचिटणीस अमोल
नानकर यांनी आपल्या मनोगताच्या माध्यमातून सांगितले की, भारतीय जनता पक्षाचे कुठलेही उपक्रम असतील, काही संकल्पना असतील त्यासाठी आमदार मंगेशदादा चव्हाण यांचे कायम पाठबळ संघटनेला मिळालेले आहे. मोदींजींच्या वाढदिवशी जन्मलेल्या बाळांना १ ग्रॅम सोन्याचे नाणे द्यावे अशी चर्चा सुरू असतानाच मंगेशदादा चव्हाण यांनी त्याला पाठिंबा दिला व त्यादृष्टीने आम्ही नियोजन सुरू केले. जवळपास २५ बाळांना प्रत्येकी १ ग्रॅम ९९.९९ कॅरेट सोन्याचे नाणे आज वाटप केले जात आहे. या उपक्रमाची दखल संघटनेने घेतली असून राज्यात एकमेव चाळीसगाव तालुक्यात अश्या प्रकारचा उपक्रम आमदार मंगेशदादा चव्हाण व भारतीय जनता पक्षाच्या वतीने संपन्न होत असल्याचे त्यांनी सांगितले.