साकळी ता.यावल (प्रतिनिधी) भुसावळ येथील जागर प्रतिष्ठान ने सालाबादप्रमाने यंदाही आपली दिवाळी आदिवासी व दुर्लक्षित पाड्यांवर साजरी केली. यावेळी यावल अभयारण्य परिक्षेत्रातील पाल परिसरातील ठीक ठिकाणी असलेल्या वाड्या वस्तीत प्रत्यक्ष घरोघर जाऊन दिवाळी फराळाचे वाटप करण्यात आले.
जागर प्रतिष्ठान २०१४ पासून दिवाळी सन आदिवासी भागात फराळ व वस्त्रदान करून साजरा करीत आहे. आज अनेक सामाजिक संस्था याच सेवाभावी वृत्तीने कार्य करीत असल्याने जागर प्रतिष्ठान ने रुजविलेल्या रोपट्याचे विशाल वटवृक्षात रूपांतर होवू पाहत आहे. जागर ने यंदाही दुर्लक्षित असलेल्या सातपुड्यातील पहाडी भागात असलेल्या पाड्यांवर जावून दिवाळीचा आनंद देत आदिवासी बांधवांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविले. लोकसहभागातून जमविलेले ५० किलो फराळ, मोतीचुर लाडू, मिठाई व कपड्यांचे वाटप करण्यात आले. प्रसंगी प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा पंकज पाटील, उपाध्यक्ष श्रीराम सपकाळे, कोषाध्यक्ष हृषिकेश पवार, सचिव प्रा निलेश गुरूचल, कायदेतज्ज्ञ अँड. हरेश पाटील, संचालक पवन पाटील, गोकुळ सोनवणे, जागर मित्र अमोल पाटील, तुषार फालक, दीपक राजपूत, नरेंद्र पाटील आदी उपस्थित होते.