जळगाव (प्रतिनिधी) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष मा. राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधिलकी जपत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जळगाव येथे रुग्ण व रुग्णांच्या नातेवाईकांना केळी वाटपाचा उपक्रम राबविण्यात आला.
या उपक्रमांतर्गत ५०० डझन उत्कृष्ट दर्जाच्या केळींचे वाटप करण्यात आले. या उपक्रमासाठी ज्योतिबा फूट कंपनी, जळगाव यांनी सहकार्य केले. या उपक्रमामुळे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना थोडासा दिलासा मिळाला.
कार्यक्रम प्रसंगी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष ॲड. जमील देशपांडे, उपमहानगराध्यक्ष श्रीकृष्ण मेंगडे, ललित शर्मा, जनहितेचे राजेंद्र निकम, शेतकरी सेनेचे अविनाश पाटील, राहुल चव्हाण, सतीश सैदाने, पवन सपकाळे, विवेक थांबेत, किरण पाटील, हर्षल वाणी आदी उपस्थित होते.
या सामाजिक उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत असून, मनसे कार्यकर्त्यांनी समाजाप्रती आपली बांधिलकी अधोरेखित केली आहे.
ॲड. जमील देशपांडे
जिल्हाध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना, जळगाव