चोपडा (प्रतिनिधी) जवळपास १९० वर्षांपूर्वी म्हणजे ६ जानेवारी १८३२ रोजी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी दर्पण हे वृत्तपत्र सुरू करून , मराठीतील आद्य संपादक होण्याच्या बहुमान मिळविला. त्यांची आठवण म्हणून ६ जानेवारी रोजी पत्रकार दिवस साजरा केला जातो. त्याच्याच एक भाग म्हणून भारतीय पत्रकार महासंघ व रोटरी क्लब ऑफ चोपडा यांच्या संयुक्त विद्यमाने अतिदुर्गम भागातील वनगाव पांढरी व उत्तमनगर येथे आदिवासी बांधवांना थंडीच्या दिवसात ब्लॅंकेट वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला.
सध्या संपूर्ण जिल्ह्यात थंडीची लाट आहे, लोकांना घराबाहेर निघणे त्रासदायक होत आहे. कडाक्याच्या थंडीपासून बचाव व्हावा , थंडीपासून संरक्षण मिळावे म्हणून थंडीच्या दिवसात आदिवासी बांधवांना ब्लॅंकेट वाटप करावे असे ठरल्याने दि. ५ जानेवारी रोजी तालुक्यातील वनगाव पांढरी येथे रोटरी क्लब चोपड्याचे विद्यमान अध्यक्ष ॲड रुपेश पाटील, अडावद येथील लोकनियुक्त सरपंच सौ भावना माळी यांच्या प्रमुख उपस्थितीत ब्लॅंकेट वाटप करण्यात आले.
दि. ६ जानेवारी रोजी तालुक्यातील अतिदुर्गम भागातील उत्तम नगर येथे भारतीय पत्रकार महासंघाच्या वतीने आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून पत्रकार दिवस साजरा करण्यात आला तसेच ब्लँकेट वाटप देखील करण्यात आले. यावेळी सत्रासेन येथील लोकनियुक्त सरपंच सौ वंदना भादले ,ज्ञानेश्वर भादले ,उत्तमराव वाघ (संचालक सूतगिरणी ), नवलसिंग राजपूत ( संस्थापक अध्यक्ष ),गोरख महाले ( मानद सचिव ) ,प्रदीप पाटील ( केंद्रीय सचिव ) , राकेश कोल्हे ( केंद्रीय उपाध्यक्ष ) , प्रकाश सरदार ( सल्लागार ,) राजकुमार जैन ( राज्य उपाध्यक्ष ) , हेमंत पाटील ( संपादक दैनिक बातमीदार ) डॉ.लोकेश पवार ( एम डी ), चेतन टाटिया , पी आर माळी ,संजीव शिरसाट आदी उपस्थित होते..
कार्यक्रम यशस्वीतेसाठी विलास व्ही. पाटील ( उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष ) , सचिन जैस्वाल ( तालुका अध्यक्ष ) , तुषार सूर्यवंशी ( सचिव ) ,पी. आर. माळी पत्रकार , जितेंद्र कोळी पत्रकार , महेश पाटील पत्रकार, तौसिबभाई खाटीक पत्रकार आदींनी परिश्रम घेतले.